Shasakiya Yojanancha Khajina | Mahiticha Adhikar

₹375

408 Pages
AUTHOR :- Purushottam Bhapkar, Manjusha Mutha
ISBN :- 978-9352204977

Share On :

Description

माहितीचा अधिकार स्वातंत्र्यानंतर प्रथमच १२ ऑक्टोबर २००५ पासून देशातील नागरिकांना प्रदान करण्यात आला आहे. या अधिकारांतर्गत भारताचा नागरिक कोणतेही रेकॉर्ड, दस्तऐवज, परिपत्रक, आदेश, रिपोर्टस्, लॉगबुक प्राप्त झालेले सल्ले, निविदा इ.च्या प्रती मिळवू शकतो. म्हणजेच माहितीचा अधिकारामुळे सरकारी कामकाज व धोरणाबाबत आजपर्यंत अलीबाबाच्या गुहेप्रमाणे बंद असलेली माहिती उघडण्याची चावीच जणू जनतेला प्राप्त झाली आहे.
माहितीचा अधिकार हा सरकारला लोकांच्या प्रति जबाबदार बनण्याच्या संघर्षपूर्ण लढ्याचा विचार आहे. यामुळे जनतेला विधानसभा सदस्य व संसद सदस्यांना जी माहिती प्राप्त होऊ शकते, ती सर्व माहिती मिळविण्याचा अधिकार मा आहे. ज्यामुळे प्रशासनात पारदर्शकता, संवेदनशीलता, उत्तरदायित्व तर वाढेलच शिवाय सुशासन साध्य होण्यासाठी मदत होईल.
सर्वसामान्य माणसाला या अधिकाराचे महत्त्व समजावे यासाठी जनजागरणाची, प्रचार प्रसाराची आवश्यकता आहे.
प्रस्तुत पुस्तक याच मार्गावरील एक अल्पसा प्रयत्न होय. यातील कायद्याचे विश्लेषण जनसामान्यांना अत्यंत उपयुक्त ठरेल, हीच अपेक्षा!.
————————————————————————————————————————-
ग्रामीण भागात लहानाचा मोठा झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला काही प्रमाणात का होईना, शेतीबद्दल आत्मीयता असते. शेतीपिकाचे, मशागतीचे थोडेफार का होईना ज्ञान असते. स्वत:च्या गावाबद्दल आस्था असते. अर्थात, लहानपणापासूनच त्याला शेती, गरिबी, रोजगार, निसर्ग तसेच गावाच्या समस्या आदींचे बाळकडू सहजपणे पाजले जाते. असे बाळकडू प्यायलेला तरुण कुटुंबाच्या व गावाच्या विकासासाठी निश्चितच आत्मीयतेने पुढाकार घेऊन राष्ट्राच्या विकासात भर घालण्यासाठी आनंदाने पाऊल उचलेल यात शंका नाही. याच विचाराने शासनाच्या योजना त्याच्या कुटुंबासाठी आणि गावासाठी राबविण्याकरिता शासकीय यंत्रणेबरोबर त्याची मदत घेण्याचे ठरवण्यात आले.
मात्र केवळ असे ठरवून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकतर्फी निर्देश देणे योग्य नसल्याने काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी या विषयावर चर्चा करून त्यांचे मत जाणून घेण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने या कामी पुढाकार घेण्याचे बोलून दाखवले. विद्यार्थ्यांचा हा सकारात्मक प्रतिसाद विचारात घेऊन गरजू लोकांच्या आत्मनिर्भरतेसाठी म्हणजेच, सर्वांना लोकशाहीची खऱ्या अर्थाने अनुभूती मिळवून देण्यासाठी ‘कॉलेज-नॉलेज-व्हिलेज’ हा उपक्रम आनंदाने व आत्मविश्वासाने हाती घेण्यात आला. प्रस्तुत पुस्तकात या प्रकल्पाची सविस्तर व अगदी साध्या सरळ भाषेत मांडणी करण्यात आली आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shasakiya Yojanancha Khajina | Mahiticha Adhikar”

Your email address will not be published. Required fields are marked *