fbpx

Talghar | Chetkin

₹475

328 Pages
AUTHOR :- Narayan Dharap
ISBN :- 978-9352206643

Share On :

Description

“ती जागी झाली होती. कशाने, तिला माहीत नव्हते.
पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे.
कारण तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तीक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या.

तीच ती चांदण्याने उजळलेली रात्र, तेच ते चंदेरी किरण… पण आता सर्वत्र एक निश्चलता होती-मोठी विलक्षण निश्चलता होती.
वारा अजिबात पडला होता. झाडांचे एक पानही हलत नव्हते, ती सळसळत नव्हती- रातकिड्यांची किरकिर नव्हती-काहीही नव्हते.
विलक्षण शांतता.

हालचाल नाही. उघड्या खिडकीकडे पाहता पाहता तिला वाटले, हा खरा देखावा नाहीच, हे एक चित्र आहे-आपण खिडकीजवळ गेलो तर हाताला चित्रच लागेल. सर्व शरीर गारठून बधिर झाल्यासारखे वाटत होते. तिने हात उचलला, तो गालावर, कपाळावर, मानेपाशी धरला-पण हात आणि गाल दोन्ही बर्फासारखे गार होते…. जणू उष्णता, ऊब या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या…. कधी कधी शरीराला ऊबच मिळाली नव्हती….आणि या गारठविणाऱ्या भीतीतून मनाला तो स्पर्श झाला…. उदासवाणी, घाणेरडी जागा सासूबाईंच्या जाऊबाई म्हणाल्या होत्या…. आणि आता तिच्या आसपास तो तीव्र, तिखट, दुष्टतेचा अर्क एखाद्या धुक्यासारखा पसरला होता…. तिला जाणवले की, खोलीत काहीतरी आले आहे…. काहीतरी दुष्ट, विकृत, पापी, सडके, कुजके, शापित, अस्पW… त्या अतीव दुष्टतेच्या गाभ्यात एक अघोरी चेतना होती.
त्या विकृतीच्या गर्भातून एक आवाज पुटपुटत आला… “मी आलो आहे.”

————————————————————————————————————————–

चेटकीण’ ही कादंबरीविविध प्रकारच्या गूढतेने खच्चून भरलेली आहे. या कादंबरीतील अनेक प्रसंग आपल्या वास्तविक जीवनात घडल्याचे आपण ऐकलेले असते; पण बघितलेले किंवा अनुभवलेले नसते. नेमकी हीच प्रचीती या पुस्तकातून येते.

या कादंबरीला आभासी विश्वाची एक मुक्त सफरच म्हणावी लागेल.
गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी वास्तू. त्या वास्तूत अनाकलनीय घटना घडतात.

या सर्व घटना मानवाच्या आकलनापलीकडे आणि आवाक्याबाहेरच्या आहेत. या वास्तूत एक एक व्यक्ती त्या अनाकलनीय शक्तीला कशी सामोरी जाते आणि कशी गडप होत जाते; पुढे असे घडणार आहे असे माहीत असूनसुद्धा! तर काही व्यक्ती सहीसलामत सुटतात आणि ती वास्तू पवित्र होते, पिशाच्च मुक्त होते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Talghar | Chetkin”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat