Description
शरीराची हालचाल कमीतकमी करण्याच्या मानवी इतिहासातील नीचांकाकडे आपण झपाट्याने चाललो आहोत. पान का सडले? भाकरी का करपली आणि घोडा का अडला? ह्या प्रश्नांचे एकच उत्तर ’न फिरवल्याने’ असे ज्याप्रमाणे आहे, त्याचप्रमाणे वजन का वाढले? गुडघे का दुखतात? मान, पाठ का दुखते? हृदयविकार का झाला?रक्तदाब का वाढला? पचन का होत नाही? इत्यादी हजारो प्रश्नांचे उत्तर ’योग्य हालचाल न झाल्याने’ असे एकच आहे.
या शरीराला सदैव निरोगी, लवचीक ठेवण्यासाठी काय करावे? काय करू नये? याचे विवेचन एका तज्ज्ञ डॉक्टरांच्या लेखणीतून. फक्त शरीराचीच नव्हे, तर मनाचीही मशागत करणारे, आरोग्यवर्धनासाठी योग्य-अयोग्यतेचे धडे देणारे! प्रत्येकाने अवश्य संग्रही ठेवावे असे पुस्तक.
डॉ. राजीव चिंतामण शारंगपाणी
एम्.एस्.(जनरल सर्जरी) डिप्लोमा स्पोर्ट्स मेडिसीन (कलोन, जर्मनी).
एकोणचाळीस वर्षांहून अधिक काळ योगासनांचा आणि वजन उचलण्याच्या व्यायामांचा अभ्यास.
अभिनेत्यांसाठी आणि नर्तकांसाठी अनेक कार्यशाळा.
भारतात तसेच अमेरिका, जर्मनी येथील अनेक प्रमुख शहरांत व्याख्याने.
भारतीय क्रीडा प्राधिकरणासाठी काम तसेच दूरदर्शनवरील माहितीपटांसाठी साहाय्य.
विविध माध्यमांतून लेखन, मुलाखती व व्याख्याने यांद्वारे जनजागृती.
Reviews
There are no reviews yet.