The Art Of Being Alone | द आर्ट ऑफ बीइंग अलोन

₹225

120 Pages
AUTHOR :- Renuka Gavrani
ISBN :- 978-9352207879

Share On :

Description

स्वतःचे बनायला शिका.’

आपण अशा जगामध्ये राहतो, जिथे कोणीही व्यक्ती व कोणतीही गोष्ट आपल्यासोबत कायमची राहू शकत नाही. आपण अतिउत्पादनक्षम वातावरण निर्माण केले आहे, ज्यामध्ये तुमच्या मित्रांना कामाच्या अधिक चांगल्या संधींसाठी दुसऱ्या शहरात जावे लागू शकते किंवा तुम्हाला अभ्यासासाठी तुमच्या कुटुंबापासून दूर जावे लागू शकते. या सतत बदलत असलेल्या चित्रात तुम्ही एक गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे, एकटे असणे म्हणजे एकाकी असणे नव्हे. तुम्ही तुमच्यासोबत आहात एवढाच त्याचा अर्थ आहे !
‘द आर्ट ऑफ बीइंग अलोन’ या पुस्तकातून तुम्ही तुमच्या एकटेपणाचे रूपांतर ‘एकांतात’ कसे करायचे ते शिकाल. तसेच, एकटे राहण्याच्या कलेत कसे पारंगत व्हायचे ते शिकाल आणि तुमचे ‘सध्याचे आयुष्य’ तुमच्या ‘स्वप्नातील आयुष्यामध्ये’ रूपांतरित कसे करायचे तेही शिकाल.

• तुमचा एकटेपणा एकांतात कसा रूपांतरित करायचा ?
• एकटेपणाचे मूळ कारणच नष्ट करून एकटेपणाचे भय कसे दूर करायचे ? स्वतःच्याच प्रेमात पडण्यासाठी स्वतःला कसे जाणून घ्यायचे व आपल्या अंतरंगात खोलवर दडलेला ‘स्व’ कसा ओळखायचा ?
• एकांताची गोडी कशी लावून घ्यायची व तो प्रगतीचा काळ कसा बनवायचा ?
अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचावे असे पुस्तक – ‘द आर्ट ऑफ बीइंग अलोन.’

रेणुका गवरानी यांना त्यांचे अनुभव व निरीक्षणे यांविषयी लिहायला आवडते. रेणुकांचे पहिले पुस्तक आहे – ‘द वूण्डस् ऑफ माय वर्डस्.’ प्रस्तुत पुस्तकातून जीवन जगण्याविषयीचे धडे मिळतात.

Additional information

About the Author

रेणुका गवरानी यांना त्यांचे अनुभव व निरीक्षणे यांविषयी लिहायला आवडते. आपल्या शब्दांनी वाचकांसाठी हे जग सुंदर बनवणे हे त्यांचे ध्येय आहे. आपल्या लेखनाने वाचकांच्या काळजाला स्पर्श करावा एवढीच त्यांची इच्छा आहे.
आपले शब्द हळुवार चुंबनासारखे असावेत असे त्यांना वाटते. २०२० साली त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि त्या शब्दांच्या प्रेमात पडल्या. त्यांच्या लेखांना आतापर्यंत सुमारे चार दशलक्ष व्हयूज मिळाले आहेत. त्या उत्तम वाचकही आहेत. लेखन, वाचन यांखेरीज त्यांना झोपणे व खाणे प्रिय आहे.
रेणुकांचे पहिले पुस्तक आहे – ‘द वूण्डस् ऑफ माय वर्डस्.’
संपर्क : theartofbeingalone@renukagavrani.com

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Art Of Being Alone | द आर्ट ऑफ बीइंग अलोन”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat