Warren Buffett Yanche Guntavanuk Mantra | Elon Musk

₹319

408 Pages
AUTHOR :- Sudhir Rashingkar,Randy Kirk
ISBN :-

Share On :

Description

खेळण्या-बागडण्याच्या वयात एखादं मूल कोकच्या बाटल्या विकतं, घरोघरी वर्तमानपत्र टाकतं. एवढंच नव्हे तर यांसारखे अनेकविध व्यवसाय करून मिळवलेल्या रकमेतून अकराव्या वर्षी शेअर्सची खरेदी करतंलवकरच जमीन विकत घेतं आणि इन्कम टॅक्सचं रिटर्न दाखल करून हशारीने आपली मिळकत व खर्च यांचा हिशेबही मांडतं…

ही कोणतीही काल्पनिक कथा नव्हे तर हे आहे दिग्गज गुंतवणूकदार वॉरन बफे यांच्या बालपणाचं वर्णन
जगाला स्तिमित करणारं गुंतवणुकीचं साम्राज्य उभं करणारे वॉरन जितके श्रीमंत आहेत तितकेच मूल्यसंपन्नही. सर्वोच्च दर्जाची व्यावसायिक तत्त्वं आणि अफाट दानशूरता हे त्यांच्या लखलखत्या कारकिर्दीतील महत्त्वाचे पैलू.
व्यवस्थापनातील आदर्श असलेल्या वॉरन यांनी आपल्या यशाची सूत्रं वेळोवेळी सर्वांसमोर खुली केली आहेत. त्याचबरोबर दीर्घकालीन गुंतवणुकीकडे बघण्याचा विवेकी दृष्टिकोन देऊन त्यांनी गुंतवणूकदारांसमोर आदर्शही ठेवला आहे.
त्यांच्या याच दृष्टिकोनातून आकाराला आलेले हे अनोखे गुंतवणूक मंत्र वाचकांसाठी दीपस्तंभ ठरतील.

एलॉन मस्क कोणत्या गोष्टी जाणतो, ज्या तुम्ही जाणत नाही?
एलॉन मस्कनं ‘झिप टू.कॉम’ ही कंपनी शून्यातून उभी केली आणि तीन वर्षांमध्ये बावीस मिलियन (दोन कोटी तीस लक्ष) डॉलर्सचा पगार मिळवला.
त्यानंतर मस्कनं शून्यातून ‘एक्स.कॉम’ ही कंपनी उभारली आणि त्यातून चार वर्षांत १६० मिलियन (सोळा कोटी) डॉलर्स मिळवले.

त्यानंतर त्यानं स्पेसएक्स आणि टेस्ला या कंपन्यांची निर्मिती केली आणि त्यातून त्याच्या नावे तीस बिलियन (वीस अब्ज) डॉलर्सची संपत्ती जमा झाली आहे. काय म्हणतातुम्हाला त्याच्या अल्पांशानं तरी यशस्वी व्हावंसं वाटतंय ? तर, हे शक्य आहे!
नफा मिळवणारा द्रष्टा कसं बनायचं?
यशस्वीरीत्या व्यवसाय चालवण्याच्या खुब्या कशा आत्मसात करायच्या?
आपला व्यवसाय विस्तारण्यासाठी मस्क स्नेहसंबंध जोडण्यावर कसा भर देतो? तुम्ही तुमचे उत्कट प्रयत्न आणि चिकाटी कशा प्रकारे वापरावी?

व्यवसाय कोणत्याही आकाराचा असला तरी त्याचं संभाव्य यश कसं उच्च कोटीला जातं?
दर्जा आणि खर्च याबाबतचे चाकोरीबाहेरचे विचार.
कोणत्याही प्रकारचा उद्योग यशस्वी करण्यासाठी एलॉन मस्कची कार्यपद्धती का उपयुक्त ठरते?

स्पेसएक्सचा सहसंस्थापक जिम कॅन्ट्रेल याचा सल्ला माना आणि आवर्जून हे पुस्तक वाचा; कारण रँडी कर्क यांनी एलॉनला संप्रेरणा देणाऱ्या गोष्टी नेमक्या पकडल्या आहेत आणि त्या वाचून आजचा सर्वांत प्रभावशाली उद्योजक कसा घडला याचं आपल्याला मौलिक दर्शन घडतं.
अनेक बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक आणि उद्योजक रँडी कर्क यांनी एलॉन मस्क याच्या अनेक प्रचंड यशस्वी उद्योगांचं रहस्य उलगडणाऱ्या १६ कार्यपद्धती या पुस्तकात सांगितल्या आहेत, ज्यांमधून एलॉन मस्क याच्या नेतृत्वशैलीची छाप दिसून येते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Warren Buffett Yanche Guntavanuk Mantra | Elon Musk”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat