निरंजन घाटे (जन्म : १० जानेवारी, इ.स. १९४६) हे विज्ञानकथा, कादंबऱ्या लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. ते पुण्यात राहतात. भूशास्त्रामध्ये एम.एस्सी.पर्यंत शिक्षण घेतलेल्या घाट्यांनी सुरुवातीला काही काळ प्राध्यापकी केली, नंतर ते आकाशवाणीमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून दाखल झाले. त्यावेळी त्यांनी आकाशवाणीवर विज्ञानाशी संबंधित असे ६०० कार्यक्रम सादर केले. दै. तरुण भारत, पुण्यनगरी, लोकमत, लोकसत्ता, मार्मिक, स.पुण्यनगरी यांसारख्या विविध वृत्तपत्र आणि साप्तहिकांतून त्यांनी देवेन कौशिक, सुखदेव साळुंखे, प्रद्युन यादव, बाळ मुळ्ये, जी.एन.सिन्हा, गुरनाम सिंग, बाळ गुर्लहोसूर या टोपण नावाने त्यांनी स्तंभलेखन सुद्धा केले आहे.
Add Comment