Description
आचार्य चाणक्यांनी आयुष्यभर जे जे म्हणून केलं, ते इतिहास बनलं; जे जे कथन केलं, ते सुभाषित बनलं. सुमारे 2300 वर्षांपूर्वीचे त्यांचे बोल, त्यांचे विचार त्याकाळी जेवढे कालसुसंगत होते तेवढेच ते आजदेखील आहेत. त्यांचा एक-एक शब्द अनुभवांच्या कसोटीवर पारखून घेतलेल्या शुद्ध बावनकशी सोन्याप्रमाणे आहे. त्यांनी सांगितलेल्या सिद्धांतांना प्रत्येक व्यक्तीनं तसेच राष्ट्रानं आजच्या काळात काही प्रमाणात जरी आचरणात आणलं तर ती व्यक्ती, ते राष्ट्र महान अग्रणी आणि अनुकरणीय म्हणून उदयाला येईल हे निश्चित.
या पुस्तकात व्यक्तिमत्त्वविकास, धर्मसंस्था, कुटुंबसंस्था, अर्थसंस्था आणि राज्यसंस्था याविषयी चाणक्यांनी केलेलं मौलिक मार्गदर्शन असून ते म्हणजे आदर्श व सुखी जीवन जगण्याची गुरुकिल्लीच आहे. त्याद्वारे वाचकांना जीवन जगण्याची कला अवगत होईल यात शंका नाही.
Reviews
There are no reviews yet.