fbpx

GST cha Sampurna Kayda Marathit | ‘जीएसटी’ चा संपूर्ण कायदा मराठीत

₹500

600Pages
AUTHOR :- Umesh Sharma
ISBN :- 9789352201785

Share On :

Description

जीएसटी हा भारताच्या कर कायद्यामध्ये झालेला आमूलाग्र बदल आहे. “जीएसटीचा संपूर्ण कायदा मराठीत’ या पुस्तकामध्ये उपलब्ध साहित्यावरून मराठी भाषेत त्याचे भाषांतर आणि इंग्रजी हेडिंग व शब्दांसह जीएसटी कायद्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
करविषयक कायदे आणि त्यांची भाषा ही अतिशय किचकट असते. करदात्याला ते कायदे एखाद्या तज्ज्ञाने समजावून सांगेपर्यंत गूढच वाटतात. म्हणून तो करकायद्याचा विषयच सोडून देतो; पण काहीही असले तरीही आपल्याला या विषयाकडे दुर्लक्ष करता येत नाही. कारण हा विषय दैनंदिन व्यवहाराशी निगडित आहे.  भारतामध्ये वस्तू व सेवा यांच्या उत्पादनापासून ते ग्राहकांकडे येईपर्यंत प्रत्येक स्तरावर अनेक अप्रत्यक्ष करकायदे अस्तित्वात आहेत. अप्रत्यक्ष कर कायद्यांमध्ये एक्साइज ड्यूटी, कस्टम ड्यूटी, सर्व्हिस टॅक्स, व्हॅट इ. चा समावेश होतो. प्रत्येक राज्यात या प्रकारच्या कामांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सामान्य करदात्यालाही या सर्व कर कायद्यांची माहिती ठेवणे अवघड होत चालले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत राहण्यासाठी भारतात जीएसटी लागू करणे ही काळाची गरज बनली आहे.  वरील सर्व बाबींचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला असून, हे पुस्तक सर्वसामान्य जनतेसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

Additional information

About Author

श्री. उमेश शर्मा हे औरंगाबाद शहरातील प्रथितयश चार्टर्ड अकाउंटंट असून 'आर. बी. शर्मा अॅण्ड कं. चार्टर्ड अकाउंटंट्स' या वित्तविषयक फर्मचे भागीदार व प्रमुख आधारस्तंभ आहेत.
श्री. उमेशशर्मा जन्म : २८/०२/१९७६
• सीएच्या फाउंडेशन परीक्षेत भारतातून ४२वा क्रमांक पटकावला- १९९७.
• औरंगाबाद सीए बॅचचे माजी अध्यक्ष- २००२-०३
• 'दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट ऑफ इंडिया' या संस्थेच्या पश्चिम विभागीय मंडळाचे कार्यकारिणी सदस्य- २०१५-१६ ते २०१७-१८.
• दै. लोकमत, सेल्सटॅक्स रिव्ह्यू, टॅक्सगुरू, मनी प्लस या मासिकांमध्ये करविषयक लिखाण. ऑल इंडिया रेडिओ, रेडिओ मिर्ची व चेंबर ऑफ कॉमर्स इ. माध्यमातून करविषयक कार्यक्रम. मागील चार वर्षांपासून दै. लोकमतमध्ये “करनीती' हे लोकप्रिय साप्ताहिक सदर लेखन. “गुड्स अॅण्ड सर्व्हिस टॅक्स'' म्हणजेच जीएसटी या विषयावर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दिल्ली या राज्यांमध्ये विविध सीए संघटनांतर्फे सेमिनार्स.
• व्यापारी महासंघ धुळे व औरंगाबाद यांच्या सौजन्याने "जीएसटीची तोंडओळख' हे पुस्तक प्रकाशित. औरंगाबाद टॅक्स पॅक्टिशनर असोसिएशनतर्फे प्रकाशित “एम व्हॅट ऑडिट मॅन्युअल – २००६' चे मुख्य संपादक. 'मुंबई सेल्सटॅक्स पॅक्टिशनर असोसिएशन'तर्फे हैद्राबाद येथे झालेल्या आर.आर. सी. मध्ये “बेस्ट पेपर रायटर' म्हणून सन्मानित.
• 'जीएसटी आपल्यासाठी' आणि 'इन्कमटॅक्स आपल्यासाठी' हे करविषयक पुस्तके प्रकाशित.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “GST cha Sampurna Kayda Marathit | ‘जीएसटी’ चा संपूर्ण कायदा मराठीत”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat