fbpx

Mi Yashasvi Udyojak Honarach | मी यशस्वी उद्योजक होणारच

₹250

256Pages
AUTHOR :- Jeevan Muley
ISBN :- 9789352201082
Order On Whatsapp

Share On :

Description

जागतिकीकरण आणि उद्योगांचे बदलते स्वरूप पाहता तरुणाईचा एकंदर ओढा उद्योगशील झाला आहे. कैंपस प्लेसमेंटमध्ये मिळणाऱ्या गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या सोडून मुलं आपला स्वत:चा स्टार्ट अप सुरू करताना दिसत आहेत.
अशा नवीन उद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून उद्योग यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारे उद्योजकतेचे तंत्र व कौशल्य तरुणाईला समजेल आणि भावेल अशा रंजक व सोप्या शैलीत या पुस्तकाद्वारे समजावून सांगितले आहेत. त्यामुळे उद्योगशीलतेची ओढ आणखी वाढेल आणि रोजगार निर्माण करणारे तरुण मोठ्या प्रमाणात तयार होतील.
हे पुस्तक कोणासाठी?
• स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या सर्वांसाठी
• आपला उद्योग यशस्वी, विकसित करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी
• गृहलक्ष्मीसह उद्योगलक्ष्मी होऊ इच्छिणाऱ्या गृहिणींसाठी
• नोकरी सांभाळून अर्धवेळ उद्योग करू इच्छिणाऱ्या नोकरदारांसाठी
• मोकळ्या वेळेत छोटा-मोठा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या ज्येष्ठांसाठी
• कौशल्यविकास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
• उत्तम प्रशासन करू इच्छिणाऱ्या व्यवस्थापक, प्रशासकांसाठी
• उगवती पिढी रोजगारक्षम करू इच्छिणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांसाठी
• कल्पक निर्णय घेऊ इच्छिणाऱ्या नेतृत्वासाठी
• थोडक्यात सर्वांना हे पुस्तक मित्रासारखे मदत करेल.
• उद्योग सुरू करताना आणि वाढवताना उद्योगाच्या विविध पैलूंविषयी मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता असते. रोजच्या व्यावसायिक जीवनातील नेमके मार्गदर्शन येथे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे.
तरुणाईला आकर्षक वाटेल अशा भाषेत लिहिलेले हे पुस्तक त्यांच्या उद्योगाप्रति निष्ठा वाढविण्यास मदत करेल आणि यशाचे दरवाजे उघडण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करेल. म्हणजे मग आत्मविश्वासाने प्रत्येक जण जगाला सांगू शकेल- ‘मी यशस्वी उद्योजक होणारच!’

Additional information

About Author

परिचय
प्रा. जीवन मुळे
अनुभव :
प्रा. जीवन मुळे यांना अध्यापनाचा ३५ वर्षांचा अनुभव आहे. या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या तंत्रशिक्षण विभागात प्राध्यापक, स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख, प्राचार्य, उपसचिव महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ, प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी, अध्यापक विकास अधिकारी, इत्यादी प्रमुख पदावर भरीव कामगिरी केली आहे.
ते उत्तम वक्ते असून त्यांनी विद्यार्थी, प्राध्यापक, उद्योजक, प्रशासक यांच्यासाठी अनेक प्रशिक्षणवर्ग, चर्चासत्रं, कार्यशाळा कार्यान्वित केल्या आहेत.
पुरस्कारः
शैक्षणिक आणि 'उद्योग-शिक्षण समन्वय' या क्षेत्रातील प्रशंसनीय सेवेबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये
(१) इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, दिल्ली या संस्थेतर्फे 'बेस्ट पॉलिटेक्निक टीचर ऑफ महाराष्ट्र' हा पुरस्कार जयपूर (राजस्थान) येथे समारंभपूर्वक प्रदान,
(२) महाराष्ट्र शासनातर्फे 'आदर्श शिक्षक’ पुरस्कार
प्रा. मुळे यांचे उद्योजकता विकास, प्रशासकीय कौशल्य व विकास, करिअर विकास इत्यादी विषयांवर अनेक लेख वर्तमानपत्र, मासिकांत प्रसिद्ध झालेले आहेत, त्यांची स्थापत्य अभियांत्रिकी या क्षेत्रातील विविध विषयांवर ८ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत :
1) Estimating and Costing
2) Hydraulics
3) Construction management
4) Surveying
5) Advanced surveying
6) Construction Materials and process
7) Transportation Engineering
8) Irrigation Engineering

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mi Yashasvi Udyojak Honarach | मी यशस्वी उद्योजक होणारच”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat