Garbhavati ani Balacha Aahar | गर्भवती आणि बाळाचा आहार

₹200

184Pages

AUTHOR :- Sanjay Janawale; Snehlata Deshmukh; Shrikant Chorghade
ISBN :- 9789352200252

Share On :

Description

‘आई’ होणं सोपं असतं; पण ‘आईपण’ येणं अवघड असतं. बाळाची गर्भातली वाढ, त्याचा जन्म आणि जन्मानंतरचा विकास या अतिशय महत्त्वाच्या बाबी आहेत. हे वरदान त्रासदायक ठरू नये म्हणून गर्भवतीची योग्य ती काळजी घ्यावी लागते.
गर्भावस्थेत गर्भाला अन्नपुरवठा होतो तो मातेकडून म्हणून प्रत्येक महिन्यानुसार होणारी बाळाची वाढ व त्या वाढीला नेमक्या कोणत्या अन्नपदार्थाची गरज असते, कोणता आहार बाळाला सुदृढ, अव्यंग होण्यास उपयुक्त असतो, मेंदूच्या पेशींची वाढ, हृदयाचे स्नायू, हाडे, मज्जारज्जू, आतडी, फुप्फुसे या सर्वांच्या अत्युत्तम वाढीसाठी कोणत्या पौष्टिक आहाराचा पुरवठा हवा, तसेच पूर्वशालेय व शालेय मुलांना कोणता व कसा आहार दिला जावा याबद्दल प्रस्तुत पुस्तकात तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले आहे.
आपण आपल्या मुलांवर जन्मापासून अनेक संस्कार करतो. त्यांच्यावर अन्नसेवनाचे संस्कारही करायचे आहेत. त्यांचे पोषण ही आपली जबाबदारी आहे. केवळ यासाठी वाचकांना बाळ, आहार आणि पोषण साक्षर करण्याचा प्रामाणिक हेतू असणारे हे मार्गदर्शक पुस्तक आहे.

Additional information

About Author

डॉ. श्रीकांत चोरघडे
• नागपूरमधील अनुभवी व लोकप्रिय बालरोगतज्ज्ञ.
• 'तारांगण' निरामय शिशू चिकित्सा केंद्रासारखा अभिनव उपक्रम.
• बालकांना आजारपण येऊ नये, यादृष्टीने पालकांचे समुपदेशन.
• बालकांच्या आहाराविषयी मार्गदर्शन..
• 'माइंड प्रोग्रॅमिंग', 'आपला आहार आपले आरोग्य' हे पुस्तके प्रकाशित.
• ‘अडगुलं-मडगुलं' हे त्यांचे पुस्तक इंग्रजी भाषेत अनुवादित…

डॉ. स्नेहलता देशमुख
• मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू.
• लोकमान्य टिळक रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी डीन.
• उत्तम शल्यतज्ज्ञ, उत्तम शिक्षिका व उत्तम वक्त्या म्हणून प्रसिद्ध.
• १९९८ : भारत सरकारतर्फे डॉ. बी. सी. रॉय पुरस्कार प्राप्त.
• २००५ : महाराष्ट्र शासनाचा धन्वंतरी पुरस्कार प्राप्त.
• 'बिंब प्रतिबिंब', 'शब्दफुले', 'स्नेहमयी', 'अरे संस्कार संस्कार', 'गर्भसंस्कार', 'इन सर्च ऑफ अ गुड डॉक्टर' ही त्यांची गाजलेली पुस्तके.
• निवृत्तीनंतर स्त्रियांच्या प्रबोधनाचे कार्य सुरू.
• गर्भसंस्कार' उपक्रमातून गर्भवती स्त्रियांचे समुपदेशन. याच उपक्रमाअंतर्गत संपूर्ण आहारावर संशोधन.

डॉ. संजय जानवळे
• बीड येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ.
• बालकांचा आहार व पोषणविषयक पदव्युत्तर अभ्यासक्रम (पोस्ट
ग्रॅज्युएट पेडिअॅट्रिक न्यूट्रिशन) पूर्ण.
• वैद्यकीय अधिकारी म्हणून १२ वर्षं शासकीय सेवा.
• बाल आरोग्यासंदर्भात भरीव सामाजिक कार्य.
• आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये 'बालरोग' विषयक लेख प्रसिद्ध.
तसेच राज्य पातळीवरील विविध वर्तमानपत्रांमधून लेखन.
• 'बालरोग' विषयक आंतरराष्ट्रीय संशोधनात सहभाग.
• नांदुरघाट व मेळघाट यांसारख्या दुर्गम ग्रामीण भागात विशेष आरोग्यसेवा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Garbhavati ani Balacha Aahar | गर्भवती आणि बाळाचा आहार”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat