Description
सामान्य कुटुंबात जन्मलेल्या कल्पना चावलाला मातीपेक्षाही ओढ होती ती अवकाशाची. स्वच्छंदी पक्ष्याप्रमाणे अवकाशात भरारी घेण्याचे स्वप्न पाहणार्या कल्पनाने हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी आपले प्रत्येक पाऊल त्याच दिशेने टाकले. अॅरोनिटिक इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर शिक्षणासाठी कल्पना अमेरिकेत गेली तेच मुळी स्वप्नांचे पंख लेवून. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी तिने अमेरिकेचे नागरिकत्व पत्करले आणि जीवनसाथीही अमेरिकेचाच निवडला. अवकाशात जाण्याचे तिचे स्वप्न एकदा पूर्ण झाले; पण तेवढ्याने ती समाधानी झाली नाही. त्याच ओढीने पुन्हा एकदा ती कोलंबिया अंतराळयातून अंतराळ सफरीवर निघाली. ही सफरही यशस्वी झाली; पण… अवकाशाची ओढ असलेली कल्पना अवकाशातच अंतर्धान पावली. आकाशाइतकीच प्रेरणादायी असलेली अवकाशकन्येची कथा.
————————————————————————————————————————-
‘‘मी एकटी नाही. मी म्हणजे अनेकजण आहोत. मी म्हणजे जगातील सगळ्या मुली आहेत. ज्यांनी अजून शाळेचा उंबरा ओलांडला नाही. त्या शाळेबाहेरच आहेत. आज निम्मं जग उद्योगधंद्यांच्या प्रगतीनं आधुनिकतेची अन् प्रगतीची फळं चाखत आहे; पण निम्मं जग गरिबी, भूकबळी, अन्याय आणि जगण्याचा संघर्ष करत आहे. पहिल्या जागतिक युद्धास शंभर वर्षं होत आहेत; पण या युद्धाच्या विनाशाचा धडा आम्ही आजपर्यंत शिकलो नाही. आधुनिक काळात मानवानं चंद्रापर्यंत झेप घेतली आहे. मानवीशक्ती आणि तंत्रज्ञानापुढं आज काहीच अशक्य नाही. जगातील सगळ्या मुलांना चांगलं शिक्षण देण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा आपण सर्वांनी निर्धार केला पाहिजे. जगातील एकही मूल शाळेशिवाय राहणार नाही, बालकामगार म्हणून त्याचं शोषण होणार नाही, बालविवाहाचे शिकार बनणार नाही, युद्धात त्यांची आहुती पडणार नाही, मुलांना शिकविणे हा गुन्हा ठरणार नाही, या उज्ज्वल भविष्याची ज्योत आताच पेटवू या. मित्रांनो, या! आताचीच ही वेळ आहे.’’ (नोबेल पारितोषिक स्वीकारल्यानंतर मलालाने केलेल्या भाषणातून.)
————————————————————————————————————————-
सुनीता विल्यम ही आजची अद्भूत गोष्ट ठरली आहे.
अवकाशातील तिचं सहा महिन्यांचं वास्तव्य, 29 तास 17 मिनिटांचा स्पेसवॉक हा एक जागतिक विक्रमच आहे.
कष्ट, अपार मेहनत आणि जिद्दी स्त्रीची ही कहाणी मानवी जातीला अभिमान ठरावी अशी आहे.
अंतराळप्रवास आणि सुनीताची ही कथा भारतीयांसाठी गौरवगाथाच आहे.
Reviews
There are no reviews yet.