Sampurna Garbhasanskar | Garbhavatisathi Margadarshan | Baby Names : Pregnancy And Garbhavastha

₹500

AUTHOR :- Shalaka Hampras, Dr. Jayant Baride, Yashavant Kulkarni
ISBN :- B08PNMK6S5

Share On :

Description

आयुष्याच्या वाटेवर सुखदु:खाच्या क्षणांना ज्यामुळे न्याय देता येतो ते संस्कार हे खरे तर संस्कृतीचे शिलेदार असतात. पुरुष हा वंशसातत्य राखतो; पण चिवटपणे संसार सांभाळते ती स्त्रीच. ह्या स्त्रीच्या उदरात जेव्हा एक जीव तिच्याच रक्तामांसांचा घडत असतो तेव्हा त्याच्या प्रत्येक क्षणांची साक्षीदार असते ती त्याला जन्म देणारी माताच.

गर्भसंस्कारमधील माहिती ही अनुभव, अध्यात्म, विज्ञान, कला आणि आजीचा बटवा ह्यामधून पिढ्यान् पिढ्यांचा प्रवास करत आलेली आहे. त्याला आधुनिक पद्धती, शरीरशास्त्राचा एक विहंगम स्पर्श आहे. ह्यातूनच गर्भस्थ बाळाच्या जडणघडणीची योग्य अनुभूती अभिप्रेत आहे. वाचा, अनुभवा, करा आणि प्रचीती घ्या, ह्या चतुरस्र विचारांचे हे ‘सर्वांगीण गर्भसंस्कार’ आहेत. ह्यातून भावी पिढीच्या विचारांची दिशा समर्थ होऊन सुजाण, सुसंपन्न आणि बुद्धिमान बाळांचा जन्म होईल.

गर्भसंस्काराचा मूळ हेतू म्हणजे गर्भाचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक असा सर्वांगीण विकास हा असतो. या पुस्तकात गर्भसंस्काराविषयी केवळ तात्त्विक ज्ञान न देता गर्भवतीसाठी व्यवहार्य उपयोगी, नावीन्यपूर्ण अशा अत्यंत उपयुक्त ठरतील अशाच बाबींचा समावेश केला आहे. तसेच गर्भसंस्काराचे महत्त्व जाणून आजच्या पिढीने ते आचरणात आणण्यासाठी इतिहासातील प्रेरणादायी गोष्टींचा जाणीवपूर्वक समावेश केला आहे.

– सौ. प्रतिमा साकेत भांड

गर्भसंस्कार हा आमच्या पूर्वजांनी दिलेला अनमोल ठेवा आहे. या पूर्वापार चालत आलेल्या शास्त्रीय व आध्यात्मिक ज्ञानाला नवीन विज्ञान व संशोधनाची जोड मिळाल्याने गर्भसंस्कारशास्त्र अजूनच परिपूर्ण व उपयुक्त झाले आहे. प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपले मूल बुद्धिमान, सुंदर, सद्गुणी व्हावे.

आपल्या धर्मग्रंथांनी, महापुरुषांनी हे सिद्ध करून दाखविले आहे की, मुलावर गर्भात असतानाच संस्कार केल्यास ते जास्त प्रभावी ठरतात. सुभद्रा, कौशल्या, माँ जिजाऊ, त्रिशला, राणी मदलसा, मदर मेरी, भुवनेश्वरी देवी यांच्या उदाहरणावरून आपल्याला हे सहज पटू शकते.

गर्भसंस्काराच्या माध्यमातून आपल्या मुलाला आयुष्यभर साथ देईल अशी शिदोरी आपण देत असतो. कारण गर्भारपणात बाळाची प्रत्येक नवीन पेशी तयार होतानाच आई-वडिलांच्या जीन्समधून जे घटक बाळामध्ये संक्रमित होतात, त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. गर्भसंस्काराच्या ज्ञानाचा वापर करून गर्भारपणातील नऊ महिने आहार, विहार, संस्कार व या पुस्तकात दिलेल्या इतर बाबींचे आचरण केल्यास होणारी संतती नक्कीच तेजस्वी व बुद्धिमान होईल. त्यामुळे मुलांच्या उत्तम जडण-घडणीचा प्रवास सुखकर होण्यास ही पायाभरणीच ठरेल. देशाची भावी पिढी घडविण्यात खारीचा वाटा उचलणारे आणखी एक पुस्तक आपल्या हाती देताना मनस्वी आनंद आणि समाधान वाटत आहे.

———————————————————————————————————————-

गर्भधारणा, प्रसूतिपूर्व स्थिती, प्रसूती, प्रसूतिपश्चात काळ, गर्भाची व अपत्याची वाढ आणि जडणघडण. गर्भाची शरीररचना, शरीरक्रिया, जीवरासायनिक बदल, शास्त्रीय आधार, गरोदरपणातील वेळोवेळची वैद्यकीय व इतर तपासणी, सोयी, त्यांची उपलब्धता तसेच योगाभ्यास, प्राणायाम, ध्यानधारणा, गर्भसंस्कार करावयाची विविध तयारी, उद्भवू शकणार्‍या गुंतागुंती, त्यांचा प्रतिबंध व उपचार, आहाराचे नियोजन इत्यादींची समग्र, सखोल आणि साधार माहिती एकत्रित देण्याचा प्रयत्न इथे पुस्तकरूपाने केला आहे.

डॉक्टर त्रयींनी लिहिलेले असल्यामुळे साहजिकच या पुस्तकात गर्भधारणेच्याही अगोदर कोणत्या गोष्टींचा विचार केला जावा. गर्भधारणेमागील शरीरशास्त्रीय अधिष्ठान, गर्भधारणेसाठीची पूर्वतयारी, गर्भारपणात होणारे त्रास व त्यावरील उपाय याविषयी शास्त्रशुद्ध; पण जनसामान्याला कारणासहित पटेल अशा सोप्या रीतीने माहिती दिली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गर्भावस्थेतील अर्भकाचा आठवड्यानुसार त्याचा शारीरिक तसेच मानसिक विकास कसा होत जातो याची माहिती देऊन हा विकास निकोप कसा व्हावा याविषयी माहिती दिली. तसेच गर्भारपणात कोणत्या वैद्यकीय चाचण्या करून घ्याव्यात, गर्भवतीचा आहार कसा असावा, तिने व्यायाम कोणता करावा इतर कोणती काळजी घ्यावी या माहितीसोबतच बालसंगोपनाविषयीही माहिती देऊन बर्‍याच शंकांचे निरसन केले आहे.

या पुस्तकातील शिदोरीच्या आधारे तुमच्या होणार्‍या संततीचा पाया भक्कम केल्यास होणारी संतती बुद्धिमान, तेजस्वी होईल. तसेच मुले घडविण्याचा तुमचा पुढचा प्रवास आनंददायी होईल.

– सौ. प्रतिमा भांड

———————————————————————————————————————
बाळाला योग्य आणि अर्थपूर्ण नाव ठेवण्यासाठी प्रत्येक पालक धडपड करीत असतात. बाळाच्या आगमनाची चाहूल लागली की, बाळाच्या नावाचा विचार सुरू होतो. बाळाचं आगमन झालं की, ’ह्याला काय म्हणायचं?’ असं सारेच विचारतात. बाळाच्या बारशाच्या वेळी तर प्रत्येकजण आपापल्या आवडीचे नाव सुचवित असतो. अशावेळी बाळाला योग्य आणि नेमकं नाव देण्यासाठी आपली मदत करणारी 5500 अर्थपर्ण नावं.

बाळाला योग्य नाव मिळाल्याचं प्रत्येक आई-वडिलांना, आजी-आजोबांना समाधान देणारं पुस्तक.
आई-बाबा माझे नाव ठेवण्याआधी हे वाचाच!
श्रेयस – श्रेष्ठ
अरव – शांत
अखिल – संपूर्ण
अर्णव – समुद्र
अनिश – सर्वोच्च
अमर्त्य – अमर, स्वयंभू
अमेय – मापन न करता येणारा, अमर्यादित
अयान – निसर्ग, स्वभाव
अदविका – अद्वितीय
शिखा – ज्योत
शांभवी – एका राजकन्येचे नाव

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sampurna Garbhasanskar | Garbhavatisathi Margadarshan | Baby Names : Pregnancy And Garbhavastha”

Your email address will not be published. Required fields are marked *