Description
१९५०-६० च्या दशकात ज्या पिढीने जीवनातील पहिले एक दीड दशक पूर्ण केले होते, असा आजचा एकही ज्येष्ठ नागरिक नसेल की ज्याने त्याच्या बालपणी साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक वाचले नसेल. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’, ‘मीरी’ अशा कादंबऱ्या वाचून ज्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या नसतील अशी व्यक्ती विरळच. अत्यंत साधी, सरळ; पण काळजाचा ठाव घेणारी हृदयस्पर्शी भाषा हे गुरुजींच्या लिखाणाचे वैशिष्ट्य.
आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र म्हणजे ‘श्यामची आई’ असे म्हणता येईल. खुद्द गुरुजी म्हणतात की, “ही कथा लिहिताना हृदयातील सारा जिव्हाळा येथे ओतलेला आहे. या गोष्टी लिहीत असताना माझे डोळे शतवार ओले झाले होते. हृदय गहिवरून व उचंबळून आले होते. माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना ‘श्यामची आई’ वाचून जर वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल.
आपल्या मुलांवर अपार माया करणारी, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून झटणारी; पण हे संस्कार उपदेशाच्या डोसाच्या रूपात मुलांना न पाजता स्वत:च्या वागण्यातून व दैनंदिन छोट्याछोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारी ही आदर्श ‘आई’ आजच्या पिढीतील उगवत्या पिढीसाठीच नव्हे तर त्यांच्या आईबाबांसाठी प्रेरक ठरेल, हे निश्चित.
————————————————————————————————————————
आपल्या जडणघडणीत अनेकांची मदत होत असते. जन्मदाते आई-वडील, गुरुजनवर्ग, आजूबाजूंची परिसाचे हात आणि आभाळाची माया असलेली माणसं यात असतात.
अशा माणसांच्या सहा गोष्टी इथं सांगितल्या आहेत. स्वत:पलीकडे बघून ‘बापू तू शिकलं पाहिजे’ सांगणारी आभाळाची सावली झालेली वेणूआई मांगीण आहे. गोरगरिबांचा कैवारी होऊन जुलमी सावकाराचा कर्दनकाळ झालेला तंट्या भिल्ल आहे. भीमराव आंबेडकर या हुशार मूलातील तेजस्वी नायक हेरणारे सयाजीराव गायकवाड तसेच आहेत. जीवनात आनंदी व्हायचं असेल तर पैशाने विकत घेता येणार नाही अशा गोष्टींचा शोध घ्या, दुसऱ्यास आनंद देण्याचं शिका, हे सूत्र सांगणारी आनंदयात्रा तशीच आहे. तर स्वतः काम करून कलेक्टर व्हायचं स्वप्न पाहणारा आदिवासी हुकूमचंद आडे हा उद्याचा आमचा नायकही एक आहे. आपापली कमाई खरी असावी, ही माझी बालवीर जीवनातील गोष्ट आयुष्य सुंदर करण्यास मदत करू शकेल.
स्वत:पलीकडे बघायला सुरुवात करा. हे केलं तर आपलं जगणं सुंदर होऊ शकेल. त्याची सुरुवात मात्र आपण स्वत:पासून करायला हवी
– बाबा भांड
Reviews
There are no reviews yet.