Copycat Marketing 101 | Selling 101

₹200

192Pages
AUTHOR :- Burke Hedges, Zig Ziglar
ISBN :- 978-9352206124

Share On :

Description

अत्यंत यशस्वी विक्री व्यावसायिक बना
कुशल प्रेरक झिग झिग्लर विक्रीच्या मूलभूत सिद्धांतांचा परिचय देतात.

काही घडण्याची वाट बघत बसायची गरज नाही…गोष्टी घडवून आणण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे! तुम्ही अधिक प्रभावीपणे, अधिक न्यायोचितपणे आणि वारंवार लोकांचे मन कसे वळवू शकता याबद्दलच्या पायाभूत तत्त्वांचे, सेलिंग १०१ मध्ये वर्णन केले गेले आहे.
तुम्हाला हेही कळेल की, तुम्ही लोकांना देऊ करीत असलेल्या वस्तू, उत्पादने आणि सेवा त्यांना देत असताना त्यांचा वेळ, पैसा किंवा विफलता वाचवता येण्यासारखे वैयक्तिक समाधान या जगात दुसरे कोणतेच नाही.

जगप्रसिद्ध प्रेरक लेखक झिग झिग्लर त्यांच्या विक्री अनुभवांवरून तुम्हाला दाखवून देतात की,
• तुमच्या विक्री कारकिर्दीत काबाडकष्ट करण्याऐवजी चतुराईने काम कसे करावे.
• ग्राहक सेवेच्या पलीकडे जाऊन ग्राहकांना समाधान कसे द्यावे.
• ग्राहकांची गरज काय आहे आणि तुमच्या उत्पादनाने ती गरज कशी भागेल हे ओळखणे.
• योगायोगाने नव्हे तर योजनापूर्वक विक्री करणे.
• वारंवार अधिक विक्री कशी करावी.
• तुमच्या वेळेवर आणि जीवनावर ताबा मिळवणे
• तुमच्या वेळेएक व्यावसायिक विक्रेता म्हणून तुमच्या कौशल्यांना कशी धार लावावी.
• तुमच्या वेळेविक्री आणि विक्रीसाठी फोन करण्याविषयी आपल्या नाखुशीला कसे दूर सारावे.

सेलिंग १०१ तुम्हाला विक्री करण्याअगोदर, दरम्यान आणि विक्री झाल्यानंतरही आपली विक्री कारकीर्द अधिक यशस्वी बनवण्याची मूलभूत तत्त्वे दाखवते.
या कौशल्यांच्या मदतीने तुम्ही अशा मजबूत व्यवसायाची, अधिक समाधानदायक जीवनाची आणि एका व्यावसायिक विक्री कारकिर्दीची उभारणी करू शकता जे आजच्या विश्वात एक सकारात्मक बदल घडवून आणील.

————————————————————————————————————————

कॉपिकॅट मार्केटिंग १०१
पुनरावलोकन
यास मिटवू नका… संपत्ती = स्वातंत्र्य

• कर्जापासून मुक्ती
• बॉसपासून मुक्ती
• ताण-तणावापासून मुक्ती

यश मिळवण्यासाठीची जुनी पद्धत : Hx N = | (यालाच ‘पैशासाठी वेळेचा सापळा’ असंही म्हटलं जातं.) H (प्रति तास देय) x N (कामाचे तास) = I (उत्पन्न) यश मिळवण्यासाठीची आधुनिक पद्धत TXE2 = $ (यालाच ‘लीव्हरेजची शक्तीही म्हटलं जातं.) T (गुंतवलेला वेळ) x E2 (घातांकीय वृद्धी) = $ (आर्थिक स्वातंत्र्य) एकरेषीय वृद्धी : 5+5 = 10 (एकरेषीय = मर्यादित!) घातांकीय वृद्धी : 52 = 25 (घातांकीय वृद्धी = स्फोटक वृद्धी)
आता तुम्ही कोणत्या पद्धतीचं अनुकरण कराल? पैशासाठी वेळ हे बंधन… की संपत्ती मिळवणं?!!!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Copycat Marketing 101 | Selling 101”

Your email address will not be published. Required fields are marked *