Brahmananche Kasab Aani Itar Sahitya | Gulamgiri

₹350

264 Pages
AUTHOR :- Jotirao Phule
ISBN :- ‎ 9789352209729

Description

ब्राह्मणांचे कसब’ हे महात्मा जोतीराव फुले यांचे एक सुप्रसिद्ध पुस्तक आहे, ज्यामध्ये त्यांनी भारतीय समाजातील जातिव्यवस्थेचा आणि विशेषतः ब्राह्मणांच्या इतर जातींवरील प्रभावाचा तपशीलवार ऊहापोह केला आहे. हे पुस्तक काव्यरूपात असून, समाजातील दुर्बल आणि शोषित घटकांमध्ये जागृती करण्यासाठी लिहिले गेले आहे. या पुस्तकाद्वारे फुले यांनी समानता व सामाजिक सुधारणा यांचे महत्त्व स्पष्ट केले आहे. हे पुस्तक त्यांच्या व्यापक सामाजिक सुधारणा अजेंड्याचा एक भाग आहे.

प्रस्तुत पुस्तकात पुढील विषयांचा समावेश आहे :

जातीयतेवर आधारित शोषणावर भाष्य.
ब्राह्मणांच्या धर्मवर्चस्व व प्रथा यांचा उलगडा.
समाजातील अन्याय आणि विषमता यांवर उपहासात्मक टीका.
शिक्षण आणि ज्ञान यांचे महत्त्व
समता आणि बंधुता यांविषयीचे विचार
ब्राह्मण समाजाच्या मार्गदर्शनावर प्रश्नचिन्ह.
स्त्रीशिक्षणाचा आग्रह आणि महत्त्व

महात्मा फुले यांनी त्यांच्या प्रखर शब्दांनी समाजातील अशिक्षिततेला आणि अज्ञानाला उजागर केले आहे. हे पुस्तक त्यांच्या सामाजिक क्रांतिकारक विचारांचे अप्रतिम उदाहरण आहे.

“या ग्रंथाचा मुख्य उद्देश असा आहे कीं, आज शेंकडों वर्षे शूद्रादि अतिशूद्र, ब्राह्मण लोकांचें राज्य झाल्यापासून सतत दुःखें सोशीत आहेत व नानाप्रकारच्या यातनेंत आणि संकटांत दिवस काढीत आहेत, तर या गोष्टीकडे त्या सर्वांचे लक्ष लागून त्यांनीं तिजविषयीं नीट विचार करणें व येथून पुढें भटब्राह्मण लोकांचें अन्यायी जुलमापासून आपली सुटका कशी करून घेणें हाच काय तो आहे.
ते लोक परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे राहणारे लोकांस जिंकून त्या सर्वांस त्यांनी आपले दास केले व त्यांस अनेक तऱ्हेचीं क्रूर शासनें दिलीं. पुढे कांहीं काळानंतर त्या लोकांस या गोष्टीचें विस्मरण झालेसें पाहून भट लोकांनी परकीय देशांतून येऊन या देशांतील मूळचे लोकांस जिंकून त्यांस दास केल्याचें मुळींच छपवून ठेविलें. त्या लोकांनी आपली वजनदारी ह्या लोकांचे मनावर बसवावी याजकरितां जेणेकरून आपले मात्र हित होईल असे नानाप्रकारचे उपाय योजले व ते सर्व सिद्धीस जात गेले.
इंग्रज लोकांनी तर पुष्कळ ठिकाणीं इतिहास वगैरे ग्रंथांत भट लोकांनी स्वहितास्तव इतर लोक, म्हणजे, शूद्रादि अतिशूद्र लोक ह्यांस आपले गुलाम करून टाकिलें आहे, असें संमत दिलेलेंच आहे.
या देशात इंग्रज सरकार आल्यामुळें शूद्रादि अतिशूद्र भटाच्या कायिक दास्यत्वापासून मुक्त झाले खरे, परंतु आम्हांस सांगण्यास मोठें दुःख वाटतें कीं, अद्यापि आमचे दयाळू सरकारचे शूद्रादि अतिशूद्रांस विद्या देण्याविषयीं दुर्लक्ष असल्यामुळें ते अज्ञानी राहून भट लोकांचे बनावट ग्रंथांच्या संबंधानें त्यांचे मानसिक दास झालेले आहेत व त्यांस सरकारजवळ दाद मागण्याचें त्राण राहिलें नाहीं. भट लोक त्या सर्वांस प्रापंचिक सरकारी कामांत किती लुटून खातात, याजकडेस आमचे सरकारचें मुळींच लक्ष पोंहचलें नाहीं, तर त्यांनीं दयाळू होऊन या गोष्टीकडेस नीट रीतीनें लक्ष पुरवावें व त्यांस भट लोकांचे मानसिक दास्यत्वापासून मुक्त करावें अशी आम्हीं आपले जगन्नियंत्याजवळ शेवटली प्रार्थना करितों.”
१ जून १८७३
जो. गो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Brahmananche Kasab Aani Itar Sahitya | Gulamgiri”

Your email address will not be published. Required fields are marked *