fbpx

30 DAYS : Change Your Habits | The Five Second Rule

₹600

512 Pages
AUTHOR :- Marc Reklau, Mel Robbins
ISBN :- 978-9352204519

Share On :

Description

काही लोकांना इच्छित ते सगळं काही मिळतं आणि काहींना मिळत नाही.
याबाबत तुम्हाला कधी कुतूहल वाटलं आहे का? आयुष्यात बदल घडण्याची वाट पाहून तुम्ही थकून गेला आहात का? आयुष्यात काही चमत्कार घडून आयुष्य बदलण्याची अपेक्षा तुम्ही अजून किती काळ करत राहणार?
आपल्याला हवं तसं आयुष्य घडविण्यासाठी काय करावं लागतं, हे तुम्हाला ‘30 डेज – चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाइफ’ या साधे सोपे उपाय सांगणाऱ्या आणि प्रवाही भाषाशैली असणाऱ्या पुस्तकातून शिकायला मिळेल.
आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय असलेले लेखक मार्क रेक्लाऊ यांनी या पुस्तकातून काही उपयुक्त आणि अनुभवाच्या कसोटीवर खऱ्या ठरलेल्या सूचना, युक्त्या आणि स्वाध्याय दिले आहेत. या सूचना अंगी बाणवून दीर्घकाळ, सातत्यानं अमलात आणल्या तर आयुष्यात कल्पनेपलीकडे सुधारणा होते.
‘30 डेज – चेंज युअर हॅबिट्स, चेंज युअर लाइफ’ यातली एक चांगली गोष्ट अशी की, नव्या सवयी अंगी बाणवून तुम्ही उद्दिष्टाच्या दिशेनं सातत्यानं, कणाकणानं पुढे सरकू शकता. हे कसं शक्य आहे, हे या पुस्तकातून तुम्हाला समजेल. तुम्ही हे करू शकता! तुमच्या अंगी पात्रता आहे हे करण्याची!
या पुस्तकानं खरोखरच आयुष्यात बदल घडतो आणि तुम्ही एक अधिक आनंदी, आरोग्यपूर्ण, समाधानकारक आयुष्य निर्माण करू शकता. यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल : आपोआप बदल घडण्याची वाट पाहणं थांबवून, बदल घडवतील अशा कृती प्रत्यक्षात सुरू कराव्या लागतील!

————————————————————————————————————————–

• ध्येयसिद्धी कठीण वाटते?
• व्यायाम, छंद, नातेसंबंध यांच्यासाठी वेळ नाहीये?
• सुखसमृद्धीचा मार्ग सापडत नाहीये?
• आयुष्याची गाडी रुळावर आणायचीय?
तुम्ही पाच अंक मोजू शकत असाल तर तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता!
वाचून आश्चर्यचकित झालात? पण हे पूर्णत: सत्य आहे.
मानसशास्त्रीय कसोट्यांवर तावून-सुलाखून निघालेला पाच सेकंदांचा जादुई नियम तुम्हाला पुढील क्षेत्रांत वापरता येईल :
• आपलं व्यक्ति गत व व्यावसायिक आयुष्य समृद्ध करण्यासाठी
• आत्मविश्वास कमावण्यासाठी
• निरामय नातेसंबंधांसाठी
• तुमच्या स्वप्नपूर्ती, ध्येयपूर्तीसाठी
• स्वतःतील सर्वोच्च क्षमता वापरता येण्यासाठी
• आणि कल्पनातीत असं आयुष्य जगण्यासाठी
तुम्ही तत्काळ कृती करायला प्रेरित व्हावं यासाठी हा नियम एक ब्लू प्रिंट आहे. जगभरात दहा मिलियन लोक हा नियम वापरत आहेत. मग, तुम्ही वाट कसली बघताय?

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “30 DAYS : Change Your Habits | The Five Second Rule”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat