Description
या पुस्तकातील काही प्रेरणादायी विचार : माणूस केवळ त्याच्या विचारांना उन्नत करून उभारी घेऊ शकतो, जिंकू शकतो आणि सिद्धी मिळवू शकतो. माणूस स्वत:मुळेच घडतो किंवा बिघडतो. विचारांची योग्य निवड व खरा वापर करून तो दैवत्वाची उंची मिळवू शकतो; तर विचारांच्या चुकीच्या वापराने, दुर्विचाराने त्याची अधोगती पशूंपेक्षा खालच्या पातळीपर्यंत होऊ शकते. दैवत्व आणि पशू या दोन अंतिम ध्रुवांच्या दरम्यान चारित्र्याच्या विविध छटा असतात आणि मानव त्यांचा निर्माता व धनी असतो. चांगले विचार, चांगल्या कृती कधीच वाईट परिणाम आणू शकत नाहीत; वाईट विचार व कृती कधीच चांगले परिणाम आणू शकत नाहीत. ज्याने शंका व भीतीवर विजय मिळवला त्याने अपयशावर विजय मिळवला असे समजा. त्याचा प्रत्येक विचार शक्तीने भारावलेला असतो, सगळ्या अडचणींना हिमतीने तोंड दिलेले असते व शहाणपणाने त्यांच्यावर मात केलेली असते. योग्य ऋतूमध्ये त्यांच्या हेतूंची पेरणी झालेली असते. त्यामुळे ते बहराला येतात. त्यांना अशी फळे लगडतात जी कधीच जमिनीवर पडत नाहीत. शरीर मनाचा गुलाम असतो… आनंदी आणि सौंदर्यपूर्ण विचारांच्या आदेशाने त्याला तारुण्याची आणि सौंदर्याची झळाळी येते.
————————————————————————————————————————-
या पुस्तकात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून एखादा माणूस खरोखरच श्रीमंत होत असेल, तर तो माझ्या म्हणण्याचा खराखुरा पुरावा आहे. एका विशिष्ट पद्धतीने काम करून लोक श्रीमंत होऊ शकतात, हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. अर्थात त्यासाठी सर्व लोक याच पद्धतीने विचार करायला लायक असणे आवश्यक आहे.
आम्ही दुसरी गोष्ट ही सांगत आहोत की, हे पुस्तक श्रीमंत होण्याचे सूत्रे सांगणारे आहे. यातील सूत्रे एखाद्या व्यक्तीने आत्मसात केली तर ती व्यक्ती निश्चितरूपाने श्रीमंत होऊ शकते; पण त्यासाठी व्यक्तीला ही सूत्रे पूर्णपणे समजावून घ्यावी लागतील, आत्मसात करावी लागतील.
विचार करण्याची शास्त्रीय पद्धत एकच असून ती ही आहे की, ध्येयाच्या दिशेने स्पष्ट आणि स्वच्छ पद्धतीने पुढे जाणे. याहून लहान आणि स्पष्ट अशी पद्धत आतापर्यंत कोणीही सांगितलेली नाही. श्रीमंत होण्याची अशी सोपी आणि सुटसुटीत पद्धत या पुस्तकात सांगितलेली आहे. अनावश्यक आणि निरुपयोगी असलेल्या सर्व बाबींची आम्ही इथे काटछाट केली आहे. जेव्हा केव्हा तुम्ही या विषयावर चर्चा कराल तेव्हा बाकीच्या सर्व गोष्टी एकत्र करून बाजूला ठेवा आणि आपल्या डोक्यातून बाहेर काढून टाका.
फक्त याच पुस्तकात सांगितलेल्या पद्धतींचा वापर करा आणि श्रीमंत व्हा!
या जगात प्रत्येकजण श्रीमंत होण्यासाठीच जन्माला आला आहे. म्हणून तुम्हीही श्रीमंत व्हा आणि श्रीमंतीचे सुख उपभोगा.
-वल्स डी वट्टल्स
Reviews
There are no reviews yet.