Description
“ ‘थांब श्रमणा, थांब.’
त्याचे हे शब्द कानी पडताच तथागत म्हणाले, ‘मी तर थांबलो आहे अंगुलिमाल; पण आता तूदेखील थांब. हे दुष्कर्म करण्याचं आता तरी थांबव.’
अंगुलिमाल आश्चर्यानं तथागतांकडे बघू लागला. त्याला काहीच समजेनासं झालं. तथागतांना पाहून तो भारावून गेला.
तेव्हा तथागत त्याला म्हणाले, ‘बरं! असं कर, मला त्या झाडाचं एक पान तोडून दे.’
अंगुलिमालनं पटकन एक पान तोडून तथागतांना दिलं.
‘आता हे पान परत त्या झाडावर लाव,’ तथागतांनी अंगुलिमालला सांगितलं.
‘काय?’ अंगुलिमाल आश्चर्यानं म्हणाला.
तथागत शांतपणे म्हणाले, ‘होय. आता हे पान परत त्या झाडावर लाव.’
‘हे कसं शक्य आहे भन्ते. हे असं करणं शक्य तरी आहे का? झाडाचं तुटलेलं पान पुन्हा झाडाला कसं काय जोडलं जाऊ शकतं?’ अंगुलिमाल म्हणाला.
‘तू हे पान पुन्हा जोडू शकत नाहीस तर मग ते तोडलंसच का? याचाच अर्थ असा आहे अंगुलिमाल की, जर तू कुणाला जीवन देऊ शकत नसशील तर मग तुला इतरांचं जीवन हिरावून घेण्याचाही काही अधिकार नाही. तेव्हा सन्मार्गावर ये अंगुलिमाल,’ त्याला समजावत तथागत म्हणाले.
तथागतांचे हे शब्द ऐकून अंगुलिमालच्या अंतरात्म्यातील अहिंसक जागा झाला आणि अंगुलिमाल त्यांच्या चरणी लीन झाला.”
– प्रस्तुत पुस्तकातून
बौद्ध धर्मातील प्रज्ञा, शील, करुणा, नैतिकता, सदाचार आणि सद्गुण आदी तत्त्वांची शिकवण देणारे हे पुस्तक सर्वांना आदर्श जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आहे.
————————————————————————————————————————-
गेल्या अडीच हजार वर्षांपासून मानवी संस्कृतीला बौद्धधर्म सुपरिचित आहे. जगभरातील जवळजवळ अर्ध्या भूभागावर पसरलेल्या या धर्माची नव्याने ओळख करून देण्याचे महत्त्वाचे काम आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी केले.
पसरलेल्या या धर्माची नव्याने ओळख करून देण्याचे महत्त्वाचे काम आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी केले. बौद्धधर्म जागतिक संस्कृतीला मिळालेली अलौकिक देणगी आहे. बुद्धलीला सारसंग्रहातील बुद्ध चरित्र हा भाग या ग्रंथातील कथांमध्ये धर्मानंद कोसंबी यांनी उत्तम प्रकारे सादर केलेला आहे. बौद्धधर्माचे मूळचे शुद्ध स्वरूप नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगतपणे जुळवून घेण्याचे काम बुद्ध चरित्र हा ग्रंथ करतो.
आचार्य धर्मानंद कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६- जून २४, १९४७) हे एक अद्वितीय विद्वान, बौद्धधर्म, पाली भाषेचे अभ्यासक व लेखक होते. वयाच्या २३ व्या वर्षी गोव्यातील आपले घर व कुटुंब सोडून तथागत बुद्धांच्या उपदेशाच्या शोधात अनेक संकटांचा सामना करीत त्यांनी नेपाळ, सिलोन, ब्रम्हदेश वगैरे देशांत फिरून बौद्ध साहित्य आणि बौद्ध धर्मसाधना यांचे अनुशीलन केले. कोसंबी यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्धधर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेश) जाऊन त्यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला.
तसेच म्यानमारमध्ये (ब्रह्मदेश) जाऊन त्यांनी ब्रह्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. आचार्य धर्मानंद कोसंबीरचित प्रस्तुत बुद्ध चरित्र अत्यंत रसाळ असून गौतम बुद्धाचा इतिहास जाणून घेण्यास आतुर असलेल्या उपासकांची तहान शमविणारे आहे. जरा, व्याधी आणि मरण यांचं अवलोकन करून अशांत झालेला सिद्धार्थ आणि त्यानंतर गृहत्याग करून निर्वाणपदाकडे वाटचाल करणाऱ्या गौतम बुद्धांचं सुभग दर्शन आपल्याला या चरित्रातून घडते.
Reviews
There are no reviews yet.