Description
बालपण हा टप्पा असतो बाह्यजगातल्या वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा, समजून घेण्याचा. याच वयात मुलांवर भाषेचे, वक्तृत्वाचे संस्कार प्रभावीपणे करता येतात आणि त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवता येतो. भाषणे मुलांना घडवतात, त्यांच्यातील सामाजिक जाणिवा जागृत करतात. त्याचबरोबर भाषणांमुळे त्यांचा सभाधीटपणाही वाढतो. पुढील आयुष्याच्या दृष्टीने ही शिदोरी मुलांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. प्रस्तुत पुस्तकात मुलांसाठी आपले सण, आपला परिसर, महापुरुष, आपले छंद, आवडीनिवडी, आणि इतर अनेक विषयांवरील सुंदर भाषणे देण्यात आली आहेत. ओघवत्या वक्तृत्वासाठी ही भाषणे मुलांना मोलाची ठरतील यात शंका नाही.
Reviews
There are no reviews yet.