Dashkriyachi Chitrakatha | दशक्रियेची चित्रकथा

₹200

176Pages
AUTHOR :- Sanjay Krishnaji Patil
ISBN :- 9789352202126

Share On :

Description

‘दशक्रिया’ ही बाबा भांड यांची समकालीनांच्या साहित्यापेक्षा वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण कादंबरी. धर्माला आलेली अवकळा, विदारक जातिव्यवस्था, अर्थार्जनाचे संतापजनक व करुणाजनक पर्याय, उच्चनीच वर्ण-वर्गांना पोटासाठी एका पातळीवर आणणारी समाजस्थिती, अन् पैशासाठी धर्म-मृत्यू अन् कर्मकांडांतून सर्वांचे होणारं शोषण हा दशक्रियेचा विषय. मराठीतून हिंदी, इंग्रजी, कानडी भाषेत पोहोचलेल्या दशक्रियेची ही चित्रकथा.
साहित्यकृती ते सिनेमा माध्यमांतराचा पटकथा लेखनाचा प्रवास संजय कृष्णाजी पाटील यांनी ‘दशक्रियेची चित्रकथा’ या ग्रंथात मांडला आहे. हा प्रवास तसा सोपा नसतो. कलाकृतीचे पटकथेत रूपांतर करताना मूळ आशय आणि सांस्कृतिक संदर्भ हे दृश्य माध्यमातून परिणामकारक सादर करणे – ही माध्यमांतराची एक सर्जनशील निर्मितीच असते. कादंबरीचा मूळ गाभा सांभाळीत त्या कलाकृतीस चित्रपट निर्मितीच्या तंत्रात चपखल बदल करून पटकथेत मांडणे हे कौशल्यपूर्ण काम संजय कृष्णाजी पाटलांनी यशस्वीपणे केले. त्यामुळेच दशक्रिया चित्रपट राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक सन्मानाचा मानकरी ठरला आहे. परदेशाच्या चित्रपट महोत्सवात त्याचे स्वागत झाले. ‘जोगवा’ चित्रपटापासूनच्या पाटलांच्या यशस्वी प्रवासाने दशक्रिया पटकथा लेखनाद्वारे मराठीत फार मोठा टप्पा गाठला आहे. मराठी पटकथा लेखन पुस्तकात या पुस्तकाने एक महत्त्वाची भर पडणार आहे. चित्रपट पटकथा लेखन करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘दशक्रियेची चित्रकथा’ उपयोगी ठरेल.

Additional information

About Author

संजय कृष्णाजी पाटील
• “लेझीम खेळणारी पोरं" या कवितासंग्रहाला “तुका म्हणे साहित्य पुरस्कार", "यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार", "बालकवी ठोंबरे पुरस्कार", कोकण मराठी साहित्य परिषदेचा “आरती प्रभू पुरस्कार" आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा असा “विशाखा काव्य पुरस्कार" प्राप्त झालेला आहे. या कवितासंग्रहावर आधारित दोन अंकी प्रायोगिक नाटकाला “सर्वोत्कृष्ट प्रायोगिक" नाटकाचा राज्य शासनाचा पुरस्कार; तसेच म. टा. सन्मान २०१४ आणि “झी गौरव २०१४”सह एकूण ३४ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
• पटकथा, संवाद, आणि गीतलेखन केलेल्या “जोगवा' चित्रपटाला एकूण ६३ नामांकने आणि ६ राष्ट्रीय पुरस्कारांसहित ४८ पारितोषिके प्राप्त झालेली आहेत.
• पटकथा, संवाद, आणि गीतलेखन केलेल्या “पांगिरा” या चित्रपटाला २४ नामांकने आणि ११ पारितोषिके मिळालेली आहेत.
• संवादलेखन आणि गीतरचना केलेल्या “७२ मैल एक प्रवास" या चित्रपटाला हाँगकाँग येथे झालेल्या “Imffa-२०१४" (International Marathi Film Festival Awards – 2014) सोहळ्यामध्ये ७ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
• २६ जानेवारी २०१५ रोजी दिल्लीच्या राजपथावर संचलित झालेल्या आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेल्या “पंढरीची वारी' या चित्ररथास देशातून प्रथम क्रमांक मिळाला आहे.
• पटकथा, संवादलेखन आणि गीतरचना केलेल्या "दशक्रिया" या चित्रपटाला ३ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले असून त्यापैकी सर्वोकृष्ट रूपांतरित पटकथेचा (Best Adopted Screenplay) चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा चित्रपट १७ नोव्हेंबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि त्याला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
• २६ जानेवारी २०१८ रोजी दिल्लीच्या राजपथावर संचलित झालेल्या आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेल्या "शिवराज्याभिषेक सोहळा" या चित्ररथास, देशातून प्रथम क्रमांक मिळाला आहे.
• सप्टेंबर २०१८ मध्ये मुंबई येथे पार पडलेल्या भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवावयाच्या The Best Foreign Language Film या कॅटिगरीसाठी Film Federation of India यांच्यामार्फत सन्माननीय “ज्युरी” म्हणून निवड करण्यात आली होती आणि ती जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे पार पाडली.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Dashkriyachi Chitrakatha | दशक्रियेची चित्रकथा”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat