Dhammapada | Bhagwan Buddha Ani Tyancha Dhamma | धम्मपद गौतम बुद्ध | गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म

₹699

676 Pages
AUTHOR :- Tathagat Gautam Buddha
AUTHOR :- Babasaheb Ambedkar
ISBN :- 9789371187978

Share On :

Description

धम्मपद’ हा बौद्ध साहित्यामधील एक अत्यंत महत्त्वाचा व प्रेरणादायी ग्रंथ आहे. बुद्धांच्या उपदेशांचा सार या ग्रंथात संकलित करण्यात आला आहे. साध्या, प्रभावी आणि हृदयाला भिडणाऱ्या गाथांमधून जीवन जगण्याची दिशा, नीती, नैतिकता आणि आध्यात्मिक मूल्ये यांचा सखोल विचार यात मांडलेला आहे.
‘धम्मपदा’तील प्रत्येक गाथा म्हणजे एक जीवनसूत्र आहे. त्या वाचकाला अंतर्मुख करतात, विचार करायला भाग पाडतात आणि दैनंदिन जीवनात अनुसरण्यासाठी प्रेरणा देतात. त्यामुळे हा ग्रंथ फक्त धार्मिक किंवा तात्त्विक संदर्भापुरता मर्यादित न राहता प्रत्येक सामान्यांतील सामान्य माणसासाठी मार्गदर्शक ठरतो.
धम्मपद हे पुस्तक…
* विद्यार्थ्यांसाठी चारित्र्य घडवणारे
* अभ्यासकांसाठी ज्ञानवर्धक
* वाचकांसाठी आत्मिक शांती देणारे
* सर्वांसाठी आयुष्य समृद्ध करणारे आहे.
जगभरात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या आणि अनुवादित झालेल्या ग्रंथांपैकी एक असलेले ‘धम्मपद’ आजही तेवढेच कालसुसंगत आहे. मानवी जीवनातील अंधार घालवून अंतर्मनातील प्रकाश शोधण्यासाठी या ग्रंथासारखा शाश्वत साथीदार दुसरा नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रामायण-महाभारत हे ग्रंथ वाचून समाधान झाले नाही तेव्हा ते बुद्धांकडे वळले. बौद्ध धर्म हा एकमेव असा धर्म आहे की, विज्ञानाने जागृत झालेला समाज तो सहर्ष स्वीकारील. मानवासाठी कल्याणकारी असणाऱ्या या धर्मात उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्त्री-पुरुष, स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेद नाही. समानता हेच तत्त्व या धम्मात व्यापून आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे या धम्माचं मध्यवर्ती सूत्र आहे. हे तत्त्वज्ञान त्यांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथातून विस्तृतपणे मांडलेले आहे. गौतम बुद्धांच्या जीवन आणि तत्त्वज्ञानावर, समाजातील मौलिक प्रश्नांवर विवेचन करणारा हा एकमेवाद्वितीय ग्रंथ होय. सबंध मानवास समृद्ध जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा हा एक प्रमाण ग्रंथ म्हणता येईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा अखेरचा ग्रंथ असून त्यांच्या सर्व ग्रंथांत या ग्रंथाला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यांची भूमिका धर्मचिकित्सकाची होती. तर्काला पटेल ते स्वीकारायचं आणि न पटेल ते नाकारण्याचं धम्मात दिलेलं स्वातंत्र्य घेऊनच ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला.
मूळ इंग्रजीत असणारा हा ग्रंथ मराठी, हिंदी, गुजराती, तेलगू, तमिळ, कन्नड, पंजाबी आदी भाषांत अनुवादित झालेला आहे. या ग्रंथावर ‘अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झालेला आहे.
गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ज्यांची प्रगाढ निष्ठा आहे त्यांच्यासाठी आणि विद्यार्थी, ज्ञानसाधक, अभ्यासक आदींना प्रस्तुत ग्रंथ नक्कीच अत्यंत उपयुक्त ठरेल.
“विज्ञानाने जागृत झालेला समाज स्वीकारू शकेल असा एकमेव बुद्धांचा धम्म आहे, त्याशिवाय हा समाज नष्टप्राय होऊन जाईल. या आधुनिक जगात बौद्ध धर्म हा असा एकच धर्म आहे जो मानवजातीचे रक्षण करू शकेल.’
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Dhammapada | Bhagwan Buddha Ani Tyancha Dhamma | धम्मपद गौतम बुद्ध | गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म”

Your email address will not be published. Required fields are marked *