fbpx

Diabetes va Hriday-Raktavahinyanche Vikar | डायबिटिस व हृदय-रक्तवाहिन्यांचे विकार

₹225

248Pages
AUTHOR :- Dr. D. S. Kulkarni
ISBN :- 9788177869279

Share On :

Description

डॉ. डी. एस. कुलकर्णी यांनी लिहिलेले हे पुस्तक मधुमेह व हृदयरक्तवाहिन्यांचे विकार याच्याशी संबंधित ज्ञानाने खच्चून भरलेले आहे.
या पुस्तकात असलेली मधुमेह व हृदयविकार या संबंधित जीवनशैली,
आधुनिक उपचारपद्धतींची माहिती व ज्ञान यामुळे रुग्णांना खूप फायदा होणार आहे.
तसेच या आजारांशी मैत्री करणे शक्य होईल,
त्याद्वारे रुग्णांना या आजारांमुळे होणारा त्रास कमी होण्यासही मदत होईल, अशी माझी खात्री आहे.

त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये जीवनशैली व मधुमेहावरील आधुनिक उपचार याविषयी अगदी २०१३ पर्यंतचे शास्त्रीय संदर्भ दिलेले आहेत.
या पुस्तकाद्वारे मधुमेह रुग्ण, हृदयविकाराने त्रस्त असणारे रुग्ण व समाजातील इतर घटक या सर्वांना आरोग्यविषयक जाणीव निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल.
या पुस्तकातून डॉ. कुलकर्णी उपयुक्त आहार, नियमित व्यायाम, मानसिक ताणतणावाचे नियोजन, डॉक्टरी सल्ल्यानुसार मधुमेह व हृदयरोगाची नियमित तपासणी व योग्य उपचार करून आनंदी होण्याचा सल्ला देतात.
पुस्तकाच्या लिखाणाबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो.
– डॉ. हेमंत फटाले,
मधुमेह व अंत:ग्रंथी विकारतज्ज्ञ.

मधुमेह हा हृदयविकाराचा सर्वांत जवळचा मित्र. मधुमेह झाल्याबरोबर हृदयविकार छुप्या पावलाने शरीरामध्ये प्रवेश करतो. हृदयविकार व रक्तवाहिन्यांचे आजार मधुमेहामुळे खूप मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळेच हृदयविकाराचे प्रमाण खूप वाढले आहे. मधुमेह झाल्यावर कमी वयात अधिक गंभीर हृदयविकार होतो. प्रथम हृदयविकारात मृत्यू होण्याचा संभवही खूप असतो.
या पुस्तकात त्यांनी मधुमेह, हृदयविकार व रक्तवाहिन्यांचे आजार यांची अत्यंत शास्त्रशुद्ध सांगड घातली आहे. या पुस्तकामुळे समाजाचे प्रबोधन व्हावे ही प्रभूचरणी प्रार्थना करून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो.
– डॉ. विलास पुंडलीकराव मगरकर,
डी.एम. (कार्डीओ), एम. डी. मेडिसिन.

Additional information

About Author

लेखक परिचय
• डॉ. दादासाहेब शंकरराव कुलकर्णी, एम.डी. मेडिसिन, कन्सल्टिंग फिजिशियन, मधुमेह व हृदयरोगतज्ज्ञ, धन्वंतरी हॉस्पिटल, गणेशनगर, अन्विता हॉटेलसमोर, जालना रोड, बीड- ४३१ १२२. फोन : ०२४४२-२३००२६, मो. ९८२२४३०५१०.
• गेल्या दोन दशकांपासून बीड येथे कन्सल्टिंग फिजिशियन, मधुमेह व हृदयरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय.
• सर्टिफिकेट कोर्स इन डायबेटालॉजी, चेन्नई (जागतिक आरोग्य संघटनेशी संलग्न).
• गेल्या सात वर्षांपासून गणपती क्रिटिकल केअर सेंटर, बीड येथे अतिदक्षता विभागतज्ज्ञ व सीनिअर फिजिशियन म्हणून कार्यरत.
• फिजिशियन असोसिएशन ऑफ इंडिया व इंडियन मेडिकल असोसिएशनचे लाइफ मेंबर.
• २००८ साली हृदय आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल शक्ती प्रतिष्ठान,
बीड तर्फे ‘हृदयश्री' पुरस्काराने सन्मानित.
• अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय- डायबीटीस, हायपरटेन्शन, हृदयविकार व
फिजिशियन कॉन्फरन्समध्ये सहभाग.
• यावेगळ्या वृत्तपत्रांमधून डायबीटीस, हायपरटेन्शन व हृदयविकार या विषयांवर लिखाण.
• बीडच्या आकाशवाणी केंद्रावरून आरोग्य व आजारांविषयी विविध मुलाखती व भाषणे.
• एप्रिल २०१३ साली आरोग्यावरील- ‘आरोग्यसंपन्न जीवनासाठी-विज्ञान
आणि अध्यात्म' हे पुस्तक प्रकाशित.
• धन्वंतरी हॉस्पिटल व आरोग्य मित्र परिवार, बीड तर्फे- डायबीटीस,
हायपरटेन्शन, हृदयविकार, दमा, मेंदूविकार या विषयांवर व्याख्याने व सर्व
समाजासाठी अनेक मोफत शिबिरांचे आयोजन.
• बीड येथील विविध शाळा तसेच संघटनांमार्फत आरोग्यावरील विविध
विषयांवर समाजप्रबोधनपर व्याख्याने.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Diabetes va Hriday-Raktavahinyanche Vikar | डायबिटिस व हृदय-रक्तवाहिन्यांचे विकार”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat