fbpx

Dr. Keshavrao Baliram Hedgewar | डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार

₹225

160 Pages
AUTHOR :- Aradhana Kulkarni
ISBN :- 978-9352204380

Share On :

Description

“आम्ही हिंदू लोक धर्मनिष्ठ आहोत, याचा आम्हांस मोठा अभिमान वाटतो; पण धर्मरक्षण व धर्मपालन यांमध्ये फरक आहे.
स्नानसंध्यादी वैयक्तिक धार्मिक आचार यथासांग करणे म्हणजे धर्मरक्षण नव्हे.
ज्यांना धर्म जगवावयाचा आहे, त्यांच्यात धर्मावरील हल्ल्यांचा प्रतिकार करण्याची शक्ती असावयास पाहिजे.
आमच्या दीन स्थितीला आम्हीच जबाबदार आहोत. हिंदुस्थानात जर धर्मभ्रष्टता पसरली असेल तर त्याला आमची वडील पिढीच जबाबदार आहे.
परकीयांचे हल्ले त्यांना दिसत नव्हते काय? आक्रमणाची वृत्ती परकीयांत बळावत आहे, याची जाणीव ठेवा. हिंदुस्थानात हिंदू समाज स्वतंत्र राहू शकतो, तो मानाने जगू शकतो, छाती पुढे व मान वर करून चालू शकतो, हा संघाचा विश्वास आहे. यासाठी लागणारी शिस्त, शील आणि संघटन यांचे शिक्षण आज पंचवीस हजारांवर तरुण लोक घेत आहेत. संघाचे लोण खेडोपाडी व प्रांतोप्रांती पोहोचले आहे. समाजाच्या ठिकाणी शक्ती, आत्मविश्वास व स्वाभिमान उत्पन्न झाला तर पंचवीस कोटी संघटित लोकांस स्वत:च्या देशात मानाने जगणे मुळीच अशक्य नाही. हा देश हिंदुस्थान म्हणून ओळखला जातो. हिंदुत्व हा या राष्ट्राचा प्राण आहे; म्हणून या देशाची, धर्माची व संस्कृतीची सर्वतोपरी जबाबदारी हिंदूंना पार पाडता यावी, ही संघाची एकच इच्छा आहे.”
– डॉ. केशवराव हेडगेवार,
चांदा शिबिरातील भाषणाचा काही अंश
डिसेंबर, 1936

Additional information

About Author

नाव – आराधना अनिल कुलकर्णी
पद – ज्येष्ठ अधिव्याख्याता
शिक्षण – एम. ए., एम. एड्., सेट- शिक्षणशास्त्र
 प्रकाशित साहित्य
अनुबंध- कथासंग्रह
 अनुवाद
– यशोशिखरावर- झिग झिग्लर – जागतिक शास्त्रज्ञांची 15 चरित्रात्मक द्विभाषिक पुस्तके – महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा पत्रसंग्रह खंड – 3 – रवींद्रनाथ टागोर यांच्या निवडक कथा – ज्योतिष विज्ञान- ओशो – जगातील 20 महान शास्त्रज्ञ- नंदिनी सराफ
 इतर
कोलाज साप्ताहिक सदर- साप्ताहिक स्वदेश व दैनिक प्रजापत्र नैमित्तिक वृत्तपत्रीय लेखन विविध मासिकांतून कथा प्रसिद्ध

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Dr. Keshavrao Baliram Hedgewar | डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat