Description
लौकिक अर्थाने यशस्वी असणार्या पालकांचं घर सतराव्या वर्षी सोडून भरारी घेणार्या एलॉन मस्कचा प्रवास दिसतो तितका चकचकीत, आकर्षक नाही. दक्षिण आफ्रिकेतील यादवीच्या काळात एका श्वेतवर्णीय मुलाने जन्म घेतला आणि हा मुलगा सगळ्याच अर्थांनी ‘वेगळा’ ठरला. प्रणेत्यांचा वारसा, भग्न कुटुंबाचे चटके, असामान्य बुद्धिमत्ता आणि विज्ञान काल्पनिका वास्तवात आणण्याच्या ध्यासातून जगाला मिळाला ‘एलॉन मस्क.’
अब्जाधीश, भविष्याचा शिल्पकार, वादाचा केंद्रबिंदू किंवा परोपकारी उद्योजक काहीही म्हणा; पण एलॉन आज जगातील सर्वांत श्रीमंत, प्रसिद्ध आणि ध्यासवेड्या लोकांच्या यादीत अग्रणी आहे. भूलोक, अंतराळ आणि पाताळ अशा त्रिलोकीचा स्वामी होण्याची स्वप्नं बाळगून असणार्या एलॉन मस्कला त्याचा ‘का?’ सापडला आहे आणि कदाचित मोठ्या, धाडसी कल्पनांकडे आपलं बोट धरून आपल्याला नेण्याचं काम एलॉनने केलं आहे. एलॉनचा हा अचाट, विस्मयकारक प्रवास आपल्यालाही मोठी स्वप्नं बघण्यास प्रवृत्त करेल हे नक्की.
सुधा मूर्ती यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन डॉ. ज्योती धर्माधिकारी यांनी लिहिलेले हे पुस्तक अनेक संदर्भांत महत्त्वाचे आहे. सुधा मूर्तींचा प्रवास श्रीमंत आणि समृद्ध आहे. असे अनुभवविेश फार कमी लोकांच्या वाट्याला येते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एका छोट्या गावातल्या मुलीने आपल्या स्वयंप्रज्ञ इच्छाशक्तीच्या बळावर आकाशाला गवसणी घालावी, ही गोष्ट विलक्षण अशीच आहे. ज्यांना माणूस समजून घेण्यात रस आहे, त्यांना तर ही गोष्ट फारच आवडेल. इंग्लंडच्या पंतप्रधानांच्या सासूबाई असणार्या सुधा मूर्ती आता आपल्या राज्यसभेत खासदार म्हणूनही दिसणार आहेत. एक मोठा उद्योगसमूह उभा करणे, चालवणे; सामाजिक कामांसाठी पुढाकार घेणे, विविधांगी आणि वाचकप्रिय लेखन करणे अशा अनेक रूपांतून आपल्याला भेटणार्या सुधा मूर्तींचा हा अवघा जीवनपट वाचताना आपणही थक्क होतो. डॉ. ज्योती धर्माधिकारी यांनी त्यासाठी पुष्कळ परिश्रम केले असतीलच; पण तितक्याच सहज आणि सळसळत्या शैलीत हा पट त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवला आहे. सुधा मूर्ती यांच्या चाहत्यांना तर हा पट आवडेलच; पण त्यांच्याविषयी आक्षेप असणार्यांनाही हा जीवनप्रवास समजून घेणे महत्त्वाचे वाटेल!
– संजय आवटे
संपादक, लोकमत, पुणे
Reviews
There are no reviews yet.