Elon Musk+Warren Buffett(Combo)

₹248

472 Pages
AUTHOR :- Michael Vlismas & Sudhir Rashingkar
TRANSLATOR:- Gauri Salvekar
ISBN :- ‎ 978-9352209323

Share On :

Description

लौकिक अर्थाने यशस्वी असणार्‍या पालकांचं घर सतराव्या वर्षी सोडून भरारी घेणार्‍या एलॉन मस्कचा प्रवास दिसतो तितका चकचकीत, आकर्षक नाही. दक्षिण आफ्रिकेतील यादवीच्या काळात एका श्वेतवर्णीय मुलाने जन्म घेतला आणि हा मुलगा सगळ्याच अर्थांनी ‘वेगळा’ ठरला. प्रणेत्यांचा वारसा, भग्न कुटुंबाचे चटके, असामान्य बुद्धिमत्ता आणि विज्ञान काल्पनिका वास्तवात आणण्याच्या ध्यासातून जगाला मिळाला ‘एलॉन मस्क.’
अब्जाधीश, भविष्याचा शिल्पकार, वादाचा केंद्रबिंदू किंवा परोपकारी उद्योजक काहीही म्हणा; पण एलॉन आज जगातील सर्वांत श्रीमंत, प्रसिद्ध आणि ध्यासवेड्या लोकांच्या यादीत अग्रणी आहे. भूलोक, अंतराळ आणि पाताळ अशा त्रिलोकीचा स्वामी होण्याची स्वप्नं बाळगून असणार्‍या एलॉन मस्कला त्याचा ‘का?’ सापडला आहे आणि कदाचित मोठ्या, धाडसी कल्पनांकडे आपलं बोट धरून आपल्याला नेण्याचं काम एलॉनने केलं आहे. एलॉनचा हा अचाट, विस्मयकारक प्रवास आपल्यालाही मोठी स्वप्नं बघण्यास प्रवृत्त करेल हे नक्की.

खेळण्याच्या वयात कोकच्या ६ बाटल्यांचा संच विकून ५ सेंट्सचा स्वकष्टार्जित नफा मिळवणाऱ्या वॉरन यांनी पुढे गुंतवणूक क्षेत्राद्वारे अफाट संपत्ती कमावली. तुम्ही म्हणाल, प्रचंड संपत्ती तर जगातील अनेक लोकांनी कमावली आहे. मग वॉरनने यात जगावेगळं असं केलं तरी काय ?
कुठलाही कायदा न मोडता, करचुकवेगिरी न करता, व्यवसायजगतात सहसा दुर्मीळ असणाऱ्या नैतिकतेच्या मार्गाने यशाचं शिखर सर करणाऱ्या फार कमी व्यक्ती असतात. त्यांपैकी एक व्यक्ती असणं आणि त्याच्याही पुढे जाऊन, मिळवलेल्या संपत्तीपैकी ९० टक्के संपत्ती फारसा गाजावाजा न करता समाजाला परत देणं, हेच वॉरनच्या यशाचं वेगळेपण आहे.
‘समभागधारक हेच कंपनीचे मालक’ अशी सर्वस्वी वेगळी समीकरणं प्रमाण मानून, यशाच्या वाटेवरून एकटं चालत न जाता आपल्या सहकारी आणि कर्मचाऱ्यांनाही यशाचं क्षितिज दाखवणाऱ्या वॉरनकडून आपल्याला शिकण्यासारख्या असंख्य बाबी आहेत. त्या साऱ्या वाचकांसमोर अलगद उलगडणारं हे पुस्तक!
विशेष म्हणजे वॉरनने सांगितलेल्या श्रीमंत होण्याच्या १० मार्गांसह!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Elon Musk+Warren Buffett(Combo)”

Your email address will not be published. Required fields are marked *