fbpx

Garbhavatisathi Sampurna Margadarshan | गर्भवतींसाठी संपूर्ण मार्गदर्शन

₹200

160Pages
AUTHOR :- Dr. Jayant Baride; Dr. Megha Mane
ISBN :- 9788177866193
Order On Whatsapp

Share On :

Description

‘गर्भवतीसाठी संपूर्ण मार्गदर्शन’ असं या पुस्तकाचं शीर्षक असलं तरी ‘बाळाचा जन्म’ या माणसाच्या आयुष्यातील सर्वस्पर्शी अनुभवाभोवती करण्यात आलेली या पुस्तकातील मांडणी आईसह बाळाचे वडील, आजी-आजोबा यांचीही ‘बाळ जन्मा’च्या विविध टप्प्यांवरची भूमिका नेमकेपणाने स्पष्ट करते.
तक्ते, चित्र यांच्या मदतीने शास्त्रीय माहिती देणारं हे पुस्तक ‘बाळा’च्या आगमनाची तयारी साऱ्या कुटुंबांनी कशी करावी, हे सांगणारी कार्यपुस्तिका आणि जगण्याबद्दलचे शिक्षण देणारी मार्गदर्शिकाही आहे.
बाळाच्या आईबरोबरच कुटुंबीयांच्या मनातील अनेक संभाव्य प्रश्नांची उत्तरं मिळतानाच, गैरसमज दूर करणारं आणि जीवनकौशल्य विकसित करण्यास साहाय्यक ठरू शकेल, असं हे वैद्यकीय-तज्ज्ञांचं पुस्तक कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं वाचावं असंच आहे.
संपूर्ण पुस्तकात सकारात्मकतेचा एक अंतःप्रवाह वाहत असतो.
गर्भावस्थेसाठी योगासने, आहार, संगीत या साऱ्यांचं महत्त्व सांगतानाच, प्राथनेशी त्याचं नातं जोडणं, हे एकाअर्थी सृष्टी आरंभाशी, मानव जन्माशी नातं जोडण्यासारखं आहे.

मर्ढेकरांसारखा युगप्रवर्तक कवी लिहितो-
“पोरसवदा होतीस
कालपरवापावेतो
थांब उद्यांचे माऊली
तीर्थ पायांचे घेईतो”
तुमच्या-आमच्या मनातही ‘मातृ-देवते’बद्दल अशीच भावना असते ना?
– संजय आर्वीकर

Additional information

About Author

लेखक परिचय
डॉ. जयंत पांडुरंग बरिदे
• एम.बी.बी.एस., डी.पी.एच., एम.डी. (पी.एस.एम.), अॅडव्हान्स्ड डिप्लोमा
इन न्यूट्रिशन अॅण्ड डायटेटिक्स, डिप्लोमा इन एम्पलॉयी कौन्सेलिंग, डिप्लोमा
इन योग ॲण्ड नॅचुरोपथी.
• सध्या प्राध्यापक, रोगप्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यकशास्त्र, पद्मश्री
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय, अहमदनगर.
• वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र – ४ वर्षे.
• पदवी-पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षक – ३४ वर्षे
• योगाभ्यास प्रशिक्षक – १५ वर्षे
• Textbook of Community Medicine : J.P. Baride, A.P. Kulkarni]
Vora medical publishers, Mumbai.
• सामुदायिक आरोग्य आणि परिचारिका सेवा ज. पां. बरिदे, अ.पु. कुलकर्णी,
साकेत प्रकाशन, औरंगाबाद संदर्भग्रंथ म्हणून मान्यताप्राप्त.
• Manual of Biostatistics : (Baride, Kulkarni, Mujumdar) JAYPEE
Brothers New Delhi.
• योग हृदय : जयंत बरिदे पृथा प्रकाशन औरंगाबाद
निरामय वार्धक्यय : लेखन संपादन : पृथा प्रकाशन औरंगाबाद
बीज अंकुरे : डॉ. जयंत बरिदे, डॉ. शिरडकर
• अँथेंक्स : अंताणू
• Case Studies in Health Management : NIHFW New Delhi/ MCQ in PSM : Baride, Kulkarni
दैनिक, नियतकालिके यातून विपुल लिखाण/आकाशवाणी तसेच केंद्रीय क्षेत्रीय प्रचार कार्यालयाद्वारे आरोग्यशिक्षण कार्य.

डॉ. सौ. स्वाती सुधीर शिरडकर
• एम.बी.बी.एस., एम.डी. (प्रसूती व स्त्रीरोगचिकित्साशास्त्र)
समुपदेशन पदव्युत्तर पदविका; न्यायवैद्यकशास्त्र पदव्युत्तर पदविका.
प्राध्यापक व विभागप्रमुख, प्रसूती व स्त्रीरोगचिकित्साशास्त्र, महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद.
• पदवी-पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षक- २० वर्षे
• निरामय वार्धक्य (लेखन), पृथा प्रकाशन औरंगाबाद
• बीज अंकुरे : बरिदे, शिरडकर.
• दैनिके, नियतकालिके, आकाशवाणी, क्षेत्रीय प्रचार कार्यालय औरंगाबाद, विविध महाविद्यालये आणि विद्यालयातून आरोग्यशिक्षणविषयक लेखन व किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण स्वास्थ्यावर विशेष कार्य,
• गर्भवती योगाभ्यास. गर्भसंस्कार प्रशिक्षण.
डॉ. सौ. मेघा अजय माने
• एम.बी.बी.एस., डी.सी.एच.
• वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका आरोग्य विभाग औरंगाबाद
• वैद्यकीय अधिकारी बालरोगचिकित्सक – ५ वर्षे
• बालरोगचिकित्सक वैद्यकीय व्यवसाय – २ वर्षे
• गर्भवती योगाभ्यास – गर्भसंस्कार प्रशिक्षण – ५ वर्षे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Garbhavatisathi Sampurna Margadarshan | गर्भवतींसाठी संपूर्ण मार्गदर्शन”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat