Description
भारतीय संस्कृतीला प्राचीन काळापासून पारंपारिक कथा आपण ऐकलेल्या आहेत. या कथांनी मानवी जीवमूल्यांची जपणूक करून मानवांवर संस्कार केले. या कथांमध्ये इसापनीती कथांचा महत्त्वाचा वाटा आहे. इसापच्या नीतिकथा रंजक आणि उद्बोधक आहेत. गेली अनेक वर्षं या कथांनी लहान-थोरांना खिळवून ठेवत कोणत्या प्रसंगी जीवनात कसे वागावे, याचे ज्ञान आणि शिकवण दिली आहे. बुद्धिमत्तेचा विकास करण्याबरोबरच सारासारविचार करून विवेकपूर्ण निर्णय घेण्यासाठीही इसापच्या नीतीकथा आबालवृद्धांना प्रेरणा देणार्या आहेत.
————————————————————————————————————————
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भवितव्यासाठी योग्य वयात योग्य संस्कार होणे गरजेचे असते. मुलांच्या मनात खोलवर संस्कार रुजवण्याचे संस्कारिक काम गोष्टी उत्तमरीत्या करीत असतात. म्हणूनच प्रस्तुत पुस्तकात मुलांच्या विकासासाठी निवडक संस्कार कथा तसेच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून तात्पर्य दिले आहे. हे तात्पर्य मुलांवर उत्तम संस्कारासाठी नक्कीच उपयुक्त ठरतील.
Reviews
There are no reviews yet.