fbpx

Jaanata Ajaanata, Ayushyane Dilele Dhade | जाणता अजाणता…आयुष्याने दिलेले धडे

₹499

416 Pages
AUTHOR :- Anupam Kher
ISBN :- 978-9352203024

Share On :

Description

ही अखेर नक्कीच नाही.
अजून कितीतरी नवी क्षितिजे कवेत घ्यायची आहेत.
आणि तीसुद्धा या एकाच आयुष्यात! शक्यता अनंत आहेत.
आणि माझी भावी पटकथा अजून लिहिलेलीसुद्धा नाहीये.
माझे आयुष्य परिमित नाही, सीमित नाही, परिभाषित नाही.
माझे आयुष्य मुक्त आहे, अनंत आहे व अपरिमेय आहे.
पडद्यामागील रोचक कथा-किस्से आणि आयुष्यात मिळालेल्या अनुभवांचे दुर्मीळ, मौल्यवान संचित उलगडणारी विलक्षण, रंजक व दिलखुलास कहाणी…
अनुपम खेर यांच्या जीवनाची कथा बॉक्स ऑफिसवर ‘हिट’ ठरलेल्या एखाद्या जबरदस्त मसाला सिनेमासारखीच आहे. त्यामध्ये नाट्य आहे, विनोद, रोमान्स आणि ‘अ‍ॅक्शन’सुद्धा आहे! शिमल्यासारख्या छोट्याशा गावातला हा मुलगा आज जगातील सर्वांत मान्यताप्राप्त अभिनेत्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आणि सिनेमा व कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचा मानकरी ठरला!
प्रतिभेची खाण असलेल्या या अभिनेत्याच्या नावावर सुमारे 530 सिनेमे जमा आहेत (ही संख्या आणखी वाढते आहे). अनुपम खेर केवळ त्यांच्या तुळतुळीत डोक्यामुळेच नव्हे तर त्यांचा परखड दृष्टिकोन व बेधडक मतांमुळेही वेगळे उठून दिसतात. साहजिकच त्यांचे आत्मचरित्रही तसेच आहे… हा त्यांच्या आयुष्यातील नुसता घटनाक्रम नाही तर या आत्मकथेद्वारे त्यांनी आयुष्यात मिळालेल्या धड्यांचे संचित उलगडले आहे. त्यामुळे हे आत्मकथन कलाकार बनण्याची आकांक्षा असलेल्या प्रत्येकाच्या व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सामान्य माणसाच्या मनाचा नक्कीच ठाव घेईल.

Additional information

About Author

नवी दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे सुवर्णपदक विजेते तसेच अभिनेते-निर्माते-लेखक-मोटिव्हेशनल स्पीकर असलेले अनुपम खेर हे एक बहुप्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्व. त्यांनी भारत व पाश्चिमात्य देशांतील अनेक भाषांतून सुमारे 530 सिनेमे, 100 नाटके व टीव्हीवरील अनेक कार्यक्रमांत काम केले आहे. 2 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, 8 फिल्मफेअर पुरस्कार आणि ‘बाफटा’चे (इअऋढअ) नामांकन मिळालेल्या अनुपम खेर यांना भारत सरकारने सिनेमातील योगदानाबद्दल पद्मश्री व पद्मभूषण देऊन गौरविले आहे. ‘सारांश’, ‘डॅडी’ यांसारख्या सिनेमांनी त्यांच्या बॉलिवूडमधील करिअरची सुरुवात झाली. पुढे त्यांनी ‘सिल्व्हर लायनिंग्ज प्लेबुक’, ‘हॉटेल मुंबई’, ‘द बिग सिक’ आणि ‘अ फॅमिली मॅन’ अशा हॉलीवूडच्या मुख्य प्रवाहातील सिनेमांतही महत्त्वाच्या भूमिका केल्या. अँग ली, डेव्हिड ओ. रसेल, वूडी अॅलेन, गुरिंदर चढ्ढा, लाना व लिली वॅकोवस्की अशा प्रतिभावान दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले आहे. ‘द बेस्ट थिंग अबाउट यू इज ‘यू’!’ हे त्यांचे पुस्तक ‘बेस्टसेलर’ ठरले असून, ते सहा भाषांत अनुवादित झाले आहे. या पुस्तकाची 22 पुनर्मुद्रणे झाली आहेत. सध्या, अनुपम खेर मुंबई व न्यूयॉर्क दरम्यान येऊन-जाऊन असतात. ‘एनबीसी एंटरटेनमेंट’वरील ‘न्यू अॅमस्टरडॅम’ या गाजलेल्या टीव्ही मालिकेत ते महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Jaanata Ajaanata, Ayushyane Dilele Dhade | जाणता अजाणता…आयुष्याने दिलेले धडे”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat