Description
परीक्षा, स्पर्धा, मुलाखती आपल्याला वेळोवेळी द्याव्या लागतात. ही अशी आव्हाने आहेत की, त्यांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी धैर्य, आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. आपण दृढ आत्मविश्वास आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अधिकाधिक यश मिळवू शकतो. यासाठी आपल्याला स्वतःची बुद्धिमत्ता आणि सुप्त क्षमतांचा शोध घेऊन त्यांचा अधिकाधिक वापर करावा लागेल. यशाची अपेक्षा सर्वांनाच असते.
प्रस्तुत पुस्तकात दिलेल्या अभ्यासाच्या तंत्रांचा वापर करून तुम्ही परीक्षेत भरघोस यश मिळवू शकता. या पुस्तकातील तंत्रांचा वापर करून बऱ्याच विद्यार्थ्यांनी परीक्षेत सर्वोच्च स्थान मिळविले आहे. यामध्ये अत्यंत सरळ आणि . सोप्या भाषेत; तसेच मनोरंजक पद्धतीने प्रेरणादायक प्रसंग रेखाटण्यात आले आहेत. परीक्षेत यश मिळविण्यासाठी काही तंत्रे, नियम व क्लृप्त्या सांगितलेल्या आहेत. तसेच परीक्षेत येणाऱ्या अडचणी आणि त्याचा सामना कसा करावयाचा, याविषयीही मार्गदर्शन केले आहे.
विविध क्षेत्रात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना व वाचकांना मेरिटमध्ये येण्यासाठी या पुस्तकाची नक्कीच मदत होईल
Reviews
There are no reviews yet.