Description
डॉ. विलास गाजरे हे अनुभवी, ज्येष्ठ पशुवैद्य असून त्यांनी एका हाताने पशुतपासणी, तर दुसऱ्या हाताने लेखणीचे कार्य निरंतर चालू ठेवले आहे. शेळीपालनासंदर्भात त्यांनी अनुभवलेल्या अनेक बाबी, सूक्ष्म निरीक्षणे, उपचारपद्धती यांच्या अंतर्भावामुळे सदरील पुस्तकाची उपयुक्तता वाढली आहे.
या पुस्तकात शेळीपालनविषयक अनेक बाबींची माहिती सविस्तरपणे दिली आहे. शेळ्यांच्या जाती, व्यवस्थापनपद्धती आणि सकस आहार या मुद्द्यांवर अधिक सांगोपांग विवेचन करण्यात आले आहे. शेळीपालनात आरोग्यसंवर्धनाचा आणि उत्पादनवाढीचा कार्यक्रम राबविण्याच्या मौलिक सूचनांचा अंतर्भाव आहे.
शेळीपालनाचा व्यवसाय हा बंदिस्त व अर्धबंदिस्त पद्धतीने केल्यास पर्यावरण रक्षणाबरोबरच स्वयंरोजगार उपलब्ध होऊ शकतो, हे सिद्धच झाले आहे. या दृष्टीने सदरील पुस्तकात शेळी व तिचे व्यवस्थापन, आहार, निगा, आरोग्यप्रतिबंधक उपचार यांची सखोल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
हे पुस्तक नवोदितांसाठी, बेरोजगार व स्वयंरोजगारासाठी धडपडणाऱ्या ग्रामीण युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल, अशी अपेक्षा आहे.
Reviews
There are no reviews yet.