fbpx

Leadership 101 | Self Improvement 101 | Sucsess 101 | Attitude 101

₹400

434Pages
AUTHOR :- John C. Maxwell
ISBN :- 978-9352206117

Share On :

Description

दृष्टीकोन तुम्हाला आणि तुमच्या संघाला घडवू किंवा बिघडवू शकतो!
चांगल्या दृष्टिकोनामुळे संघाला यश मिळेलच अशी खात्री देता येत नाही; मात्र वाईट दृष्टिकोन नक्कीच अपयशाला कारणीभूत ठरतो. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ च्या विक्रीचा उच्चांक गाठणाऱ्या या पुस्तकाचे लेखक व नेतृत्वक्षमता प्रशिक्षणातील तज्ज्ञ जॉन मॅक्सवेल यांनी वरील वाक्यात दृष्टिकोनाच्या महत्त्वाविषयी भाष्य केले आहे. ज्यांनी कोणी चुकीचा दृष्टिकोन बाळगून लोकांचे नेतृत्व करायचा प्रयत्न केला आहे, त्यांच्या वाट्याला केवळ निराशाच आली आहे. हेच सूत्र लक्षात घेऊन लेखक दृष्टिकोनाविषयीच्या महत्त्वाच्या बाबींवर या पुस्तकात वाचकांना रुचेल व पटेल अशा भाषेत प्रकाश टाकतो. त्या बाबी खालीलप्रमाणे:
• आपण करीत असलेल्या कामावर आपल्या दृष्टिकोनाचा कसा प्रभाव पडतो, हे ओळखणे.
• स्वतःमधील व इतरांमधील त्रासदायक भावना, वर्तन व विचार यांच्यावर लक्ष केंद्रित करून त्यावर उपाययोजना करणे.
• सांघिक कार्याला कमकुवत करणारे सहा सर्वसामान्य दृष्टिकोन ओळखणे.
• चुकीचा दृष्टिकोन बदलण्याचे रहस्य जाणून घेणे.
• आपले काम सुधारण्याच्या दृष्टीने यश व अपयशाच्या नवीन व्याख्या तयार करणे.
• नेत्याला उच्चतम स्तरावर घेऊन जाणाऱ्या दृष्टिकोनाचा अंगीकार करणे.
आपले आयुष्य बदलवून टाकण्यासाठी योग्य तोच दृष्टिकोन कसा आत्मसात करावा व नकारात्मक दृष्टिकोनापासून कसे दूर राहावे याचे मार्गदर्शन करणारे प्रभावी पुस्तक!
————————————————————————————————————————

यशाचा पाया
यश प्राप्त करणे ही आपल्यापैकी बहुतेक सर्वच्या आयुष्यातील मोठी असते पण आपल्याला खरेच पूर्व माहीत आहे का की आशा यश मिळते? तुम्ही आता तुम्हाला खात्री आहे का?
आधारभूत तत्वं मात्र नहोस १०१ या पुस्तकाल जॉन मैक्सवेल यांनी यशाचे विश्लेषण करून त्यासाठी अत्यावश्यक घटक सुबद्ध पद्धतीने आपल्यासमोर मांडले आणि आहे. या तुला यश कसे दिसते ते शिष्टा तर तुम्ही अक्स पाठीला तुमच्या मार्गावरील करमाड करपाचे प्रभावी मार्ग सुचवतात.
तुमच्यात आणि तुमच्या संबंधीत प्रत्येकात यशच यशाला जन्म देते.
————————————————————————————————————————

आपले आयुष्य घडविण्यासाठी, आधी स्वतःतच सुधारणा करा!
न्यूयॉर्क टाइम्सच्या विक्रीचा उच्चांक गाठणारे ‘सेल्फ- इंप्रूव्हमेंट १०१’ या पुस्तकाचे लेखक जॉन मॅक्सवेल यांनी वरील संदेश दिला आहे. ‘बऱ्याच लोकांना हे समजत नाही की, यशस्वी व अयशस्वी लोकांच्या क्षमतांमध्ये लक्षणीय फरक नसतो; तर आपल्या क्षमतांचा सर्वाधिक प्रमाणात उपयोग करून घेण्याच्या इच्छेत त्यांचे वेगळेपण असते. वैयक्तिक विकासाशी बांधील राहून ते आपल्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत पोहोचतात. हेच या पुस्तकाचे सार आहे. डॉ. मॅक्सवेल यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाद्वारे खालील बाबींवर प्रकाश टाकला आहे:
• आयुष्यभर विद्यार्थी बनून कसे राहावे याचे रहस्य.
• अधिकाधिक विकासासाठी आपला वेळ कुठे केंद्रित करावा.
• अधिकाधिक चांगले बनण्यासाठी कोणते त्याग करणे योग्य ठरते.
• स्वयंसुधारणेच्या प्रक्रियेतील अडथळ्यांवर मात कशी करावी.
• अनुभवाचे रूपांतर सुज्ञपणात करण्याची गुरुकिल्ली.
नेते नेहमीच विद्यार्थी असतात! लोकांमधील सुप्र सामर्थ्य योगायोगाने उमलत नाही.
————————————————————————————————————————–

आपल्यातील सुप्त नेतृत्वक्षमतांचे अवकाश विस्तारा!
तुम्ही कोणीही असला तरी, तुम्ही नक्कीच उत्तम नेतृत्व करू शकता.
नेतृत्व १०१ या आपल्या विलक्षण प्रभावी पुस्तकात न्यूयॉर्क टाइम्सच्या विक्रीचा उच्चांक गाठणारे जॉन मॅक्सवेल वरील संदेश देतात. जॉन मॅक्सवेल यांच्यासारखा मुरब्बी नेता, या पुस्तकात आपल्यातील आपला जन्मजात नेतृत्वक्षमतांचा विकास कसा करावा यासाठी थोडक्यात; पण सुस्पष्ट व प्रेरणादायी आराखडा तयार करून देतात. ते आपल्याला पुढील गोष्टी शिकण्यास प्रोत्साहन देतातः
आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करा व इतरांना त्यात सामावून घ्या.
चिरस्थायी वारस निर्माण करा.
• आपल्या अनुयायांची निष्ठा विकसित करा.
• आपल्या नेतृत्वाच्या गुणवत्तेत सातत्याने गुंतवणूक करीत राहा.
• इतरांवर आपला प्रभाव पाडण्याची क्षमता वाढवा.
• नेतृत्वाचा लगाम आपल्या हाती ठेवा .
• मार्गदर्शनाद्वारे इतरांचे सबलीकरण करा.
• विश्वासाचा पाया तयार करा.
• तुमचे चारित्र्य व परिणाम यात सुधारणा करण्यासाठी स्वयंशिस्त आत्मसात करा.
आपल्यातील सुप्त नेतृत्वक्षमतांचा अधिकाधिक विस्तार व वापर कसा करावा आणि लोकांमधून उत्तम नेते कसे घडवावेत याचे मार्गदर्शन करणारे प्रभावी पुस्तक.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Leadership 101 | Self Improvement 101 | Sucsess 101 | Attitude 101”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat