Mukesh Ambani | मुकेश अंबानी

₹200

152 Pages
AUTHOR :- Sudhir Rashingkar
ISBN :- 978-9352204250

Share On :

Description

“सर्वाधिक स्वस्त, तरीही गुणवत्तेने श्रेष्ठ वस्तूंचे उत्पादन करणे हा माझा शब्द आहे.”
– मुकेश अंबानी
एखादा विश्वव्यापी उद्योग उभारण्यामागे कित्येक पिढ्यांची दूरदृष्टी वा मेहनत असते.
मात्र एक नव्हे तर असे अनेक प्रचंड उद्योगसमूह उभारण्याचे कार्य मुकेश अंबानी यांनी केले आहे.
वयाच्या 18 व्या वर्षीच कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्त झालेल्या मुकेश यांनी वडिलांच्या आग्रहाखातर अमेरिकेतील उच्च शिक्षण अर्धवट सोडले.
लगेचच रिलायन्स कंपनीच्या पाताळगंगा इथल्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या उभारणीचे काम वयाच्या विशीतच यशस्वीरीत्या पूर्ण केले.
वडील धीरूभाई अंबानी यांच्या निधनामुळे त्यांनी कंपनीचा कारभार हाती घेतला.
नंतरच्या काही दशकांत त्यांनी विविध क्षेत्रांतील उद्योगात पर्दापण करून जगातील सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादीत वरचा क्रमांक पटकावला.
निष्ठावंत अधिकारी आणि कर्मचार्यांची मोठी फळी त्यांनी उभारली. त्याचबरोबर क्रीडा, पर्यावरण, सेवाभावी कार्य, शिक्षण क्षेत्र यामध्येही मोलाचे योगदान दिले. विशेष म्हणजे आपल्या पत्नीला आणि पुढच्या पिढीलाही हे सर्व कार्य पुढे नेण्यासाठी घडवले. हे सर्व त्यांनी कसे घडवून आणले, कोणती व्यवस्थापन सूत्रे वापरली, त्यांच्या यशाच्या कार्यपद्धती काय आणि तरुण पिढीला ते कोणता संदेश देऊ इच्छितात याविषयी कॉर्पोरेट गुरू ‘मुकेश अंबानी’ या पुस्तकातून जाणून घ्या.
प्रथितयश लेखक डॉ. सुधीर राशिंगकर यांनी ते इथे ओघवत्या शैलीत विस्तृतपणे सांगितले आहे.

Additional information

About Author

डॉ. सुधीर राशिंगकर
द्विपदवीधर तंत्रज्ञ. व्यवसाय व्यवस्थापन विषयात पुणे (आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) विद्यापीठातून विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी संपादन. याच विषयातील पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून कार्य. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध समित्यांवर काम. सुरुवातीला काही औद्योगिक कंपन्यांतून अधिकारी म्हणून काम केल्यावर गेली 45 वर्षे प्रकल्प व्यवस्थापन आणि विपणन या क्षेत्रात स्वतंत्र व्यवसायात कार्य.
व्यवसायाच्या निमित्ताने देशात आणि 40 हून अधिक परदेशांत विस्तृत प्रवास. रोटरी इंटरनॅशनल या सेवाभावी संघटनेमध्ये रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आणि अन्य पदांवर गेल्या चार दशकांपासून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल व रोटरी साहित्याच्या मराठीत भाषांतराच्या अनेक वर्षे सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल रोटरी गौरव पुरस्कार प्राप्त.
अन्य काही सामाजिक आणि व्यावसायिक संस्था-संघटनांमध्ये विविध पदांवर केलेल्या कामांबद्दलही गौरव पुरस्कार. गेली चारहून अधिक दशके सातत्याने विविध नियतकालिकांतून लिखाण. पंचावन्न पुस्तके प्रकाशित. त्यातील काहींना गौरव पुरस्कार प्राप्त. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून सुप्रसिद्ध.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Mukesh Ambani | मुकेश अंबानी”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat