Narayan Murthy | Sudha Murty

₹400

328 Pages
AUTHOR :- Dr. Jyoti Dharmadhikari, Rahul Singhal
ISBN :- 978-9352206360

Share On :

Description

सुधा मूर्ती यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन डॉ.
ज्योती धर्माधिकारी यांनी लिहिलेले हे पुस्तक अनेक संदर्भांत महत्त्वाचे आहे.

सुधा मूर्तींचा प्रवास श्रीमंत आणि समृद्ध आहे.
असे अनुभवविेश फार कमी लोकांच्या वाट्याला येते.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एका छोट्या गावातल्या मुलीने आपल्या स्वयंप्रज्ञ इच्छाशक्तीच्या बळावर आकाशाला गवसणी घालावी, ही गोष्ट विलक्षण अशीच आहे.
ज्यांना माणूस समजून घेण्यात रस आहे, त्यांना तर ही गोष्ट फारच आवडेल.

इंग्लंडच्या पंतप्रधानांच्या सासूबाई असणार्‍या सुधा मूर्ती आता आपल्या राज्यसभेत खासदार म्हणूनही दिसणार आहेत.
एक मोठा उद्योगसमूह उभा करणे, चालवणे; सामाजिक कामांसाठी पुढाकार घेणे, विविधांगी आणि वाचकप्रिय लेखन करणे अशा अनेक रूपांतून आपल्याला भेटणार्‍या सुधा मूर्तींचा हा अवघा जीवनपट वाचताना आपणही थक्क होतो.

डॉ. ज्योती धर्माधिकारी यांनी त्यासाठी पुष्कळ परिश्रम केले असतीलच; पण तितक्याच सहज आणि सळसळत्या शैलीत हा पट त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवला आहे. सुधा मूर्ती यांच्या चाहत्यांना तर हा पट आवडेलच; पण त्यांच्याविषयी आक्षेप असणार्‍यांनाही हा जीवनप्रवास समजून घेणे महत्त्वाचे वाटेल!
– संजय आवटे
संपादक, लोकमत, पुणे

————————————————————————————————————————–

नारायण मूर्ती : एक प्रेरणादायी व्यक्तितत्त्व. उद्योग व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना सॉफटवेअर उद्योगाची त्यांनी या देशात मुहूर्तमेढ रोवली.
देशातील बहुतेक उद्योजक जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेला विरोध करीत असताना मूर्ती यांनी जागतिकीकरणाचा आपल्या उद्योगाच्या भरभराटीसाठी उपयोग करून घेतला.

एक व्यक्ती म्हणूनही मूर्ती यांचे जीवन प्रेरणादायी आहे.
डोक्याने उद्योजक आणि हृदयाने समाजवादी असलेल्या मूर्ती यांनी आपल्या उद्योगातील कर्मचार्‍यांना भागधारक होण्याची संधी उपलब्ध करून दिली. आपल्या वैयक्तिक संपत्तीचा जास्तीत जास्त वाटा समाजासाठी, विद्यार्थी आणि गोरगरिबांच्या विकासासाठी खर्च करून मूर्ती यांनी वेगळा आदर्श घालून दिला आहे.

यशस्वी उद्योजक आणि करोडो रूपयांच्या संपत्तीचा मालक बनल्यानंतरही मूर्ती यांनी साधी राहण सोडली नाही. समाजकारणात महात्मा गांधीनी घालून दिलेले आदर्श औद्योगिक जीवनात जपले. तरुणांना दिशो देणारे विचार समजून घेण्यासाठी मूर्ती यांचे चरित्र मुळातूनच वाचायला हवे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Narayan Murthy | Sudha Murty”

Your email address will not be published. Required fields are marked *