One Page Story | वन पेज स्टोरी

₹200

128 Pages

AUTHOR :- Dr. Vikram Lokhande
ISBN :- ‎ 9789352203680

Share On :

Description

“डॉ. विक्रम लोखंडे यांच्या ‘वन पेज स्टोरी’ या कथासंग्रहाचे स्वागत करताना मला मन:पूर्वक आनंद होत आहे. या संग्रहातल्या बऱ्याच कथा नात्याशी सबधित आहेत. नाती. त्यातन निर्माण होणाऱ्या अपेक्षा. अपेक्षाभंग, फसवणूक अनेक कथांमधून दिसून येते. खरंतर या सगळ्यात लेखकाला कशाचं महत्त्व वाटतं, लेखक कशाचं कौतुक करतो यावर कथांचं मोठेपण ठरतं. या संग्रहातील अनेक कथामधून लेखकान माणसाच्या उदार वृत्तीचं दर्शन घडवलं आहे.
‘वन पेज स्टोरी’चा फॉर्म हा चतुराईची मागणी करणारा आहे. लेखक आपल्याला हात धरून एका दिशेने घेऊन जातो आणि पोहोचल्यावर आपण भलतीकडेच आलो असं वाचकाच्या लक्षात येतं. परंतु फसवणूक सुद्धा आनंददायक आहे असं वाटायला लावणाऱ्या काही कथा या संग्रहात आहेत.”
– प्रा. अजित दळवी

“आपण डॉक्टरला आपल्यासारखी तीही माणसंच आहेत अस समजत नाही. खूपदा शस्त्रक्रियेमुळे तर त्यांना भावना आहेत असंही आपल्याला वाटत नाही. वर्दीत पद पाहतो आपण, माणूस बघत नाही किंवा तशी वेळही खूपदा येत नाही. पण काही भन्नाट गोष्टी घडतात आणि वर्दीतल्या माणसांची ओळख होते.
डॉ. विक्रम लोखंडे यांचं ‘वन पेज स्टोरी’ हे पुस्तक म्हणजे असाच भन्नाट कथासंग्रह. भरमसाट पानं सांगू शकत नाहीत एवढं ‘वन पेज स्टोरी’ एका पानात सांगून जातात. एरव्ही आपल्याला डॉक्टरला भेटून बरं वाटतं, पण या डॉक्टरला वाचूनही बरं वाटेल याची खात्री आहे.”
– अरविंद जगताप

Additional information

About Author

डॉ. विक्रम लोखंडे
डॉ. विक्रम लोखंडे हे विख्यात गायनॅकॉलॉजिस्ट आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 15,000 गायनॅकॉलॉजिक लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. तसंच वेगवेगळ्या 300 हॉस्पिटल्समध्ये लॅप्रोस्कोपिक सर्जन म्हणून काम केलेलं आहे.

त्यांचं शालेय शिक्षण हे शासकीय विद्यानिकेतन, औरंगाबाद येथे झालेलं असून एमबीबीएस पदवी एम.जी.एम. मेडिकल कॉलेज, औरंगाबाद येथून पूर्ण केली आहे. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण बी.जे.मेडिकल कॉलेज, पुणे येथे घेतलं आहे. बर्‍याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय

लॅप्रोस्कोपी कॉन्फरन्समध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे.

ते नारायणी हॉस्पिटल (3 लॅप्रोस्कोपी, फर्टिलिटी क्लिनिक अ‍ॅण्ड मॅटर्निटी होम), औरंगाबाद या संस्थेचे संचालक आहेत. ते एम.जी.एम. मेडिकल कॉलेज, औरंगाबाद येथे सहयोगी प्राध्यापक असून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत.

लॅप्रोस्कोपी फेलोशिप प्रोग्रामच्या माध्यमातून नारायणी हॉस्पिटल या संस्थेत अनेक स्त्रीरोगतज्ज्ञ लॅप्रोस्कोपी ऑपरेशन शिकण्यासाठी येतात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “One Page Story | वन पेज स्टोरी”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat