fbpx

Patanjali Yogasutra | पतंजली योग सूत्र

₹170

144 Pages
AUTHOR :- Swami Vivekananda
ISBN :- 9352208269

Share On :

Description

‘पतंजली योगसूत्र’ हा चतुरंग योगासंबंधित शरीर, मन आणि आत्मा यांच्या अनेकानेक क्रियांचा खोलवर अभ्यास केलेला एक प्राचीन ग्रंथ होय. मूळ ग्रंथाची रचना संस्कृत भाषेत आहे. स्वामी विवेकानंद प्रत्येक सूत्राचे सखोल, परिपूर्ण विवेचन करीत आपल्या ध्येयप्राप्तीच्या मार्गाची उकल करून देतात. ज्याद्वारे, एकाग्रता आणि ध्यानासारख्या प्राथमिक पायर्यांवरून उत्तरोत्तर प्रगती साधून मुक्ती आणि आत्मशोध यांसारख्या उच्च ध्येयाकडे वाटचाल होते.

हा ग्रंथ म्हणजे आपल्या मौल्यवान खजिन्यात भर घालणारे एक रत्न आहे. ही सूत्रे आणि त्यावरील विवेचन म्हणजे प्राचीन आणि अर्वाचीन ज्ञानविद्यांचा संगम, सहजसाध्य तंत्रांचा अभ्यास, जीवनाच्या तत्त्वज्ञानाची सहज, सुलभ मांडणी आहे, हे समजून घेत जीवनाचा सर्वांगीण स्तर उन्नत करणे होय.

जगद्विख्यात आणि अलौकिक साधुत्व असणारे स्वामी विवेकानंद म्हणजे श्री स्वामी परमहंस रामकृष्ण यांचे शिष्योत्तम, पट्टशिष्य. जगाच्या कानाकोपर्यात भारतीय विचारधारेची पताका फडकावणारी प्रभावी शक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद. रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठ यांची स्थापना त्यांनीच केली. युरोप आणि अमेरिकेला हिंदू तत्त्वज्ञानाची खरी ओळख करून देण्यासाठी त्यांनी असंख्य व्याख्याने आयोजित केली होती. राष्ट्रधर्माचे महत्त्व जगभरात उलगडून सांगणारे महापुरुष म्हणून त्यांची कीर्ती आहे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Patanjali Yogasutra | पतंजली योग सूत्र”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat