Punha Zuluk | Sukhi Strichi Saadi | पुन्हा झुळूक | सुखी स्त्रीची साडी |

₹450

320 Pages
AUTHOR :- Mangala Godbole
ISBN :- 9789349573154

Share On :

Description

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सगळेच, त्यातल्या गफलतींवर चुकामुकींवर वैतागत असतो;
पण त्यातलेच चिमुकले, गमतीचे क्षण कोणी टिपले, रंगवले तर? छोट्या-सामान्य जगण्याच्या रणरणत्या वास्तवामध्ये एखादी शीतल झुळूक येऊन गेल्यासारखं वाटेल ना? तसाच सुखद प्रत्यय पुन्हा-पुन्हा देण्यासाठी…
‘पुन्हा झुळूक’
आता साकेत प्रकाशनाच्या विद्यमाने.

सुखी माणसाच्या सदऱ्याविषयी तुम्ही ऐकलं असेल. सुखी स्त्रीच्या साडीविषयी काही ऐकलं आहेत?
डाऊन्स सिण्ड्रोम हा शब्द तुमच्या कानावरून गेला असेल; पण ‘सावत्र आई सिण्ड्रोम’ असू शकतो असं तुम्ही कधी मानलंय?
भाषा वापरण्यात, ऐकण्यात तुमचा जन्म गेलाय; पण आज आपण फारच अनुवादित भाषा वापरतोय हे तुम्हाला जाणवलंय?
रोजच्या जगण्याविषयी, रोज वापरतो त्या भाषेविषयी, रोज कानांवर पडणाऱ्या गाण्यांविषयी, नेहमीच्या वाचनातल्या पुस्तकांविषयी, हसत खेळत छोटी-मोठी भाष्यं करणारा हा ललित लेखसंग्रह तुम्ही वाचायलाच हवा.
सुखी स्त्रीची साडी मिरवायला कोणाही बाईला आवडेल यात शंकाच नाही; पण सुखी स्त्रीच्या साडीचा लहरता पदर निरखायला पुरुषांना आवडणार नाही असं थोडंच आहे? वाचून तर बघा!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Punha Zuluk | Sukhi Strichi Saadi | पुन्हा झुळूक | सुखी स्त्रीची साडी |”

Your email address will not be published. Required fields are marked *