Rajmata Jijau Marathi Book | Akbar Birbalchya Chhan Chhan Goshty | Akbar Birbalachya Majedar Goshti

Description

एका अशक्यप्राय, खडतर स्वप्नासाठी आपलं सबंध आयुष्य वाहून घ्यावं आणि शेवटी स्वप्नपूर्ती झाल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घ्यावा, ही तशी कविकल्पना वाटते; पण ही वस्तुस्थिती शत-प्रतिशत घडली आहे, स्वराज्यसारथी जिजाऊसाहेबांच्या जीवनामध्ये !
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे हा जिजाऊंचा श्वास. हेच त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं. जिजाऊसाहेबांनी स्वराज्याचा स्वप्नपूर्ती सोहळा अर्थातच शिवराज्याभिषेक ‘याची देही याची डोळा’ पाहिला आणि कृतकृत्य भावनेने अखेरचा श्वास घेतला.
स्वार्थाचा लवलेशही न बाळगता जनहिताचे व्यापक उद्दिष्ट ठेवून प्राणपणाने आजन्म लढा देणाऱ्या जिजाऊंना एक नव्हे तर दोन पिढ्या घडवण्याचे श्रेय जाते. छत्रपती संभाजी महाराज यांनादेखील त्यांनी आपल्या मुशीत घडवले, म्हणूनच महाराष्ट्राला दुसरे छत्रपतीही तितकेच पराक्रमी मिळाले. दोन पिढ्या घडवण्याबरोबर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी धाडस, सन्मार्गावर चालणे आणि मूल्यांची शिदोरी जिजाऊ ठेवून गेल्या आहेत. या माउलींचे आपल्यावर असलेले ऋण फेडणे केवळ अशक्यच!

प्राचीन काळापासून अकबर-बिरबलाच्या कथा मुलांचे मनोरंजन करत आल्या आहेत. खळखळून हसवणार्या या कथा मुलांची तार्किद शक्ती वाढवून बुद्धीला चालना देतात.
. बिरबलाचे हजरजबाबीपणा, न्यायप्रियता, दुर्बलांना मदत करणे या गुणांबरोबरच मुलांना बिरबलासारखे बुद्धिमान बनवण्यासाठी गोष्टीनंतर मार्गदर्शन केले आहे.
. असा हा ज्ञान आणि मनोरंजानाचा खजिना असलेल्या कथा प्रत्येक मुलाच्या संग्रही असायलाच पाहिजे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Rajmata Jijau Marathi Book | Akbar Birbalchya Chhan Chhan Goshty | Akbar Birbalachya Majedar Goshti”

Your email address will not be published. Required fields are marked *