Rajmata Jijau Marathi Book | Swami Vivekananda

Description

एका अशक्यप्राय, खडतर स्वप्नासाठी आपलं सबंध आयुष्य वाहून घ्यावं आणि शेवटी स्वप्नपूर्ती झाल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घ्यावा, ही तशी कविकल्पना वाटते; पण ही वस्तुस्थिती शत-प्रतिशत घडली आहे, स्वराज्यसारथी जिजाऊसाहेबांच्या जीवनामध्ये !
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे हा जिजाऊंचा श्वास. हेच त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं. जिजाऊसाहेबांनी स्वराज्याचा स्वप्नपूर्ती सोहळा अर्थातच शिवराज्याभिषेक ‘याची देही याची डोळा’ पाहिला आणि कृतकृत्य भावनेने अखेरचा श्वास घेतला.
स्वार्थाचा लवलेशही न बाळगता जनहिताचे व्यापक उद्दिष्ट ठेवून प्राणपणाने आजन्म लढा देणाऱ्या जिजाऊंना एक नव्हे तर दोन पिढ्या घडवण्याचे श्रेय जाते. छत्रपती संभाजी महाराज यांनादेखील त्यांनी आपल्या मुशीत घडवले, म्हणूनच महाराष्ट्राला दुसरे छत्रपतीही तितकेच पराक्रमी मिळाले. दोन पिढ्या घडवण्याबरोबर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी धाडस, सन्मार्गावर चालणे आणि मूल्यांची शिदोरी जिजाऊ ठेवून गेल्या आहेत. या माउलींचे आपल्यावर असलेले ऋण फेडणे केवळ अशक्यच!

हिंदू धर्माची थोरवी जगभर समजावून सांगणारे आणि विश्वधर्म संमेलनात विश्वबंधुत्वाची भूमिका मांडणारे थोर विचारवंत म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांना हिंदू धर्माइतकीच किंवा त्याहून काकणभर अधिक भारताच्या विकासाची तळमळ होती. त्यांना नवा भारत घडवायचा होता म्हणून त्यांनी भारतभ्रमण केले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरताना त्यांनी सामान्य माणसातील स्वाभिमान आणि ‘स्व’ जागृत करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे लोण देशभर पसरले; कारण त्यासाठी अनुकूल मनोभूमी विवेकानंदांच्या विचारांनी आधीच तयार करून ठेवली होती.
स्वामीजींना सामान्य माणसांविषयी तळमळ होती. सामान्य माणूस हाच त्यांच्या धर्म आणि विकास या संकल्पनेच्या केंद्रस्थानी होता. तरुणांना ते संदेश देतात, ‘माझ्या तरुण मित्रांनो, शक्तिशाली व्हा, ठाम निश्चयाचे, तेजस्वी असे शंभर युवक जग हादरवून टाकू शकतात.’ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर विवेकानंदांचे महत्त्व सांगताना म्हणतात, ‘तुम्हाला भारत माहीत करून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा. सर्व विवेकानंद सकारात्मक आहेत, त्यांच्यात नकारात्मक असे काहीही नाही.’
जगण्याला आणि जीवनाला दिशा देणारे त्यांचे विचार स्फूर्तिदायक, प्रेरणादायक आहेत. निःस्वार्थ सेवा, शब्दांचे माहात्म्य, ईश्वरावर श्रद्धा, निर्भीड आणि दयाशील वृत्ती, आत्मत्याग आणि आत्मविश्वास, कर्तव्य, प्रेम, भक्ती आणि विश्वबंधुत्व इत्यादी महत्त्वपूर्ण घटक यात येतात. जीवनाच्या अनेकविध टप्प्यांवर योग्य-अयोग्यतेची जाण देऊन प्रेरणा, चैतन्य, उत्साह व यशाकडे नेण्यासाठी या पुस्तकाची मोलाची मदत होईल. हे जाणून घेण्यासाठी प्रस्तुत पुस्तक वाचायलाच हवे!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Rajmata Jijau Marathi Book | Swami Vivekananda”

Your email address will not be published. Required fields are marked *