Description
सुमारे १५० वर्षांच्यी उद्योग परंपरा असलेल्या टाटा ग्रुपचा य होणे हा खऱ्या अर्थाने काटेरी मुकुट आहे. ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलताना रतन टाटा यांनी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कठोरता या बाबी टाटा ग्रूपला वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. रतन टाटा यांनी अतिशय कुशलतेने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्या टेकओव्हर करतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रांत दमदारपणे आघाडी घेतली. टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपचा विस्तार केला.
रतन टाटा यांनी आपल्या निर्णयक्षमतेने आणि कौशल्याने अतिशय अवाढव्य असलेल्या टाटा ग्रुपमध्ये सळाळते चैतन्य निर्माण करून तारुण्य फुकले. अतिशय सहजतेने अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या टाटा यांचे अवघे जीवनच प्रेरणादायी आहे. नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश आणि समाजाचा विकास साधण्याची परंपरा त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे.
सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे चारचाकी गाडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक लाखाची जिसकावर्णन तयार करण्याचा संकल्प करून तो प्रत्यक्षात उतरविणारे रतन टाटा यांची औद्योगिक झेप आकाशाला गवसणी घालणारी आहे.
रतन टाटा यांच्या संपूर्ण कारकीर्दीचे ओघवत्या शैलीत लिहिलेले प्रेरणादायी चरित्र.
————————————————————————————————————————-
जोखीम घेत, नव्या वाटा तयार करणारा आणि समाजाला एक घर पुढे नेणारा धडाडीचा माणूस म्हणजे उद्योजक! संकरित बीबियाणे उद्योगाची भारतात सुरुवात करणारे बारवाले असोत की करमणुकीलाच उद्योग मानून त्यात मनोभावे काम करणारे सुभाषचंद्र गोयल असोत. या पुस्तकातील चौदाही उद्योजकांनी आपले जीवन समृद्ध करण्यात आणि समाजाला पुढे नेण्यात मोलाचा वाटा उचललेला आहे
हजारो कोटींची उलाढाल आणि हजारोंना रोजगार देणाऱ्या या उद्योजकांची वाटचाल विलक्षण रोमहर्षक आणि प्रेरणादायी आहे. दीपस्तंभाप्रमाणे प्रकाश देणारी आहे. या प्रकाशात उमलत्या पिढीस उद्योजकतेची प्रेरणा मिळून, त्यांच्यातील सर्जनशीलता आणि कार्यकर्तृत्व चहुअंगाने फुलून आले, तर ते देशाच्या सर्वांगीण विकासासाठी हवेच आहे. उद्योजकीय विषयावर गेली अनेक वर्षे सातत्याने लिखाण करणारे ‘साकेत’चे एक सिद्धहस्त लेखक सुधीर सेवेकर यांचे हे पुस्तक म्हणूनच महत्त्वाचे आहे. अत्यंत नेमकेपणाने त्यांनी निवडलेल्या उद्योजकांची गुणवैशिष्ट्ये, कार्यकर्तृत्व आणि मर्म शब्दबद्ध केलेले आहे. युवावर्गासह सर्व स्तरातील, सर्व प्रकारच्या वाचकांना प्रस्तुत पुस्तक निश्चितच आवडेल. तसेच प्रगतीचा ध्यास घेतलेल्या प्रत्येक सक्रिय माणसाने हे पुस्तक अवश्य वाचले पाहिजे!
Reviews
There are no reviews yet.