Description
सुधा मूर्ती यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन डॉ. ज्योती धर्माधिकारी यांनी लिहिलेले हे पुस्तक अनेक संदर्भांत महत्त्वाचे आहे.
सुधा मूर्तींचा प्रवास श्रीमंत आणि समृद्ध आहे. असे अनुभवविेश फार कमी लोकांच्या वाट्याला येते.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एका छोट्या गावातल्या मुलीने आपल्या स्वयंप्रज्ञ इच्छाशक्तीच्या बळावर आकाशाला गवसणी घालावी, ही गोष्ट विलक्षण अशीच आहे.
ज्यांना माणूस समजून घेण्यात रस आहे, त्यांना तर ही गोष्ट फारच आवडेल. इंग्लंडच्या पंतप्रधानांच्या सासूबाई असणार्या सुधा मूर्ती आता आपल्या राज्यसभेत खासदार म्हणूनही दिसणार आहेत.
एक मोठा उद्योगसमूह उभा करणे, चालवणे; सामाजिक कामांसाठी पुढाकार घेणे, विविधांगी आणि वाचकप्रिय लेखन करणे अशा अनेक रूपांतून आपल्याला भेटणार्या सुधा मूर्तींचा हा अवघा जीवनपट वाचताना आपणही थक्क होतो. डॉ. ज्योती धर्माधिकारी यांनी त्यासाठी पुष्कळ परिश्रम केले असतीलच; पण तितक्याच सहज आणि सळसळत्या शैलीत हा पट त्यांनी वाचकांपर्यंत पोहोचवला आहे.
सुधा मूर्ती यांच्या चाहत्यांना तर हा पट आवडेलच; पण त्यांच्याविषयी आक्षेप असणार्यांनाही हा जीवनप्रवास समजून घेणे महत्त्वाचे वाटेल!
– संजय आवटे
संपादक, लोकमत, पुणे
————————————————————————————————————————–
सुमारे १५० वर्षांच्यी उद्योग परंपरा असलेल्या टाटा ग्रुपचा य होणे हा खऱ्या अर्थाने काटेरी मुकुट आहे.
ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलताना रतन टाटा यांनी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कठोरता या बाबी टाटा ग्रूपला वेगळ्या उंचीवर घेऊन गेला.
रतन टाटा यांनी अतिशय कुशलतेने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्या टेकओव्हर करतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रांत दमदारपणे आघाडी घेतली.
टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपचा विस्तार केला.
रतन टाटा यांनी आपल्या निर्णयक्षमतेने आणि कौशल्याने अतिशय अवाढव्य असलेल्या टाटा ग्रुपमध्ये सळाळते चैतन्य निर्माण करून तारुण्य फुकले.
अतिशय सहजतेने अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या टाटा यांचे अवघे जीवनच प्रेरणादायी आहे.
नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश आणि समाजाचा विकास साधण्याची परंपरा त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे.
सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे चारचाकी गाडीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक लाखाची जिसकावर्णन तयार करण्याचा संकल्प करून तो प्रत्यक्षात उतरविणारे रतन टाटा यांची औद्योगिक झेप आकाशाला गवसणी घालणारी आहे
रतन टाटा यांच्या संपूर्ण कारकीर्दीचे ओघवत्या शैलीत लिहिलेले प्रेरणादायी चरित्र.
Reviews
There are no reviews yet.