fbpx

Samrat Prithviraj Chauhan | Maharana Pratapsingh

₹445

408 Pages
AUTHOR :- Raghuveersingh Rajput
ISBN :- B0BN8K4BB7

Share On :

Description

हळदी घाटीच्या युद्धात तसे आपले अपरिमित नुकसान झाले. मन्नासिंह, रामसिंह तोमर आणि त्याची मुले, भीमसिंह दोदिया, बिंदा झाला, बदनोरचा रामदास, शंकरदास राठोड, रावत नैतसीसारखे अनेक जीवाला जीव देणारे साथीदार आणि सैनिक आपण गमावले; पण युद्धाने आपल्याला काही शिकवले देखील..
यापुढे एवढ्या मोठ्या बलाढ्य शत्रूसमोर लढण्यासाठी मैदानात उतरण्याचा मूर्खपणा आपण कधीच करणार नाही. त्यात विजय मा तरी आपले कधीच भरून न काढता येण्यासारखे नुकसान होईल. ती जबाबदारी आम्हाला पत्करायची नाही.
या डोंगराळ भागात आपल्या आणि भिलराज पुंजाच्या वीरांसाठी लढण्याची अत्यंत सोयीची पद्धत म्हणजे गनिमी काव्याचे युद्ध! आपण फक्त तिचा अवलंब करून मोगलांना मेवाडबाहेर पिटाळून लावू शकू.

————————————————————————————————————————

एका गीतकाराने म्हटलेच आहे,

दिल्ली है दिल हिन्दुस्थान का

यह तो तिरथ है सारे जहान का ।

अशा या दिल्लीचे शत्रूंपासून रक्षण करीत होता अल्पवयीन राजा पृथ्वीराज चौहान.

भगवान भास्कराप्रमाणे अल्पावकाशातच तळपून गेलेले एक व्यक्तिमत्त्व, पृथ्वीराज चौहान! ज्यांची कारकीर्द इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरात नोंदवली जायला पाहिजे होती; परंतु तसे न होता हा शूर राजा उपेक्षितच राहिला. ठाणेश्वर भागातील तराईन येथे शहाबुद्दीन महंमद घोरीने पृथ्वीराजचा पराभव केला इतकीच दखल इतिहासाने घेतली. यापेक्षा जास्त महत्त्व पृथ्वीराजचे इतिहासाला वाटले नाही. 26 वर्षांचा अल्पावधीचा थोडा काळ पृथ्वीराजला मिळाला. तो सदैव युद्धे खेळण्यात आणि लादलेल्या युद्धांचा सामना करण्यातच खर्ची पडला.

कसे?

ते पुस्तकातच वाचा-

पृथ्वीराज चौहानांवर लिहिण्याकरिता अभ्यासला सुरूवात केली तर जन्मस्थळापासून ते अंतापर्यंत ठायीठायी विसंगती समोर येऊ लागल्या. मग मागचे संदर्भ जुळवून पुढे घडणार्या घटनांशी त्यांचा मेळ बसविण्याची सर्कस करावी लागली. पृथ्वीराजचा शेवट लिहिताना खूपच मानसिक त्रास सहन करावा लागला.

कधीही पराभूत न झालेला हा केवळ 26वर्षे वयाचा तरुण सम्राट अनाथासारखा सिरसागडाचा पायथ्याची डोळे मिटून पडतो ही कल्पनाच मोठी क्लेशदायी वाटते. त्याच्या जीवावर जीव देणारा त्याचा मित्र चंदरवरदाईसुद्धा त्याच्या अंतसमयी त्याच्याजवळ नसतो. ही हृदय हेलावून सोडणारी बाब आहे.

पृथ्वीराज वैर साधून जयचंदला काय प्राप्त झाले? फक्त दोघांचा विनाश आणि हिंदुस्थानची गुलामगिरी. ते दोघे एक झाले असते तर हिंदुस्थानकडे डोळा वर करून पाहण्याची परकीय शक्तींची हिंमत झाली नसती.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Samrat Prithviraj Chauhan | Maharana Pratapsingh”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat