Description
शुभ्र पांढरा रंग डोळ्यांना दिसला नाही कधी, तरी पांढरा रंग किती शुभ्र असू शकतो, तर दीदींनी गायलेल्या ‘मोगरा फुलला’मधल्या मोगर्याइतका.
बोक्याच्या पेजला हजारो लाइक्स् आणि कमेंट्स आल्या बातम्या छापून आल्या… बातम्या छापून आल्याची बातमी न्यूज चॅनलवर आली… मुलाखती… पुरस्कार… ‘निळू बोका’ खूश झाला… त्याला आपण वाघ आहोत, हे पटलं.
वेळ टळून गेल्यावर कौतुकाचे शब्द इतके जुनाट आणि कृत्रिम वाटायला लागतात की, त्यापेक्षा योग्य माणसांनी केलेली टीका बरी.
एळाद्या माणसाच्या यशाची गोष्ट ऐकण्यापेक्षा, दुसरा माणूस दुःखी आहे, त्याला खूप अडचणी आहेत हे ऐकायला माणसाला जास्त आवडतं.
पंपूला खूप प्रश्न पडत राहिले, खूप वेगळे विचार मनात येत राहिले त्याच्या; पण ‘उद्या सांगेन’ आणि ‘मोठं झाल्यावर कळेल’ याची यादी वाढतच गेली… आणि मग या फॅक्टरीतून एक नवीन शहाणा पंपू बाहेर पडला, अनेक शहाणे पंपू घडविण्यासाठी…
Reviews
There are no reviews yet.