Description
नानापुराणनिगमागमसंमतं यद्रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि।
स्वान्तः सुखाय तुलसी रघुनाथगाथा भाषानिबंधमतिमंजुलमातनोति।
संतचरित्रकार नाभाजीने गोस्वामी तुलसीदासांना प्रत्यक्ष वाल्मीकीचाच अवतार मानलेले आहे. तुलसीदासांच्या सर्व ग्रंथांत ‘रामचरितमानस’ हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ. रामायणाचे अवतार अनेक झाले. परंतु तुलसीरामायणाला तोड नाही. केवळ धार्मिक वाङ्मयालाच नव्हे, तर भारतीय साहित्यसृष्टीलाही तुलसीदासांचे ‘रामचरितमानस’ भूषणभूत होऊन राहिलेले आहे.
अंजनेयापरी भक्त। लेखनीं अपर वाल्मीकि।
गोस्वामी तुलसीदासां । वंदनें लक्ष लक्ष हीं।
गोस्वामीजींच्या ‘रामचरितमानसा ची सार्थ भाषांतरे अनेक उपलब्ध आहेत. माझा अनुवाद त्या सर्वापेक्षा वेगळा वाटावा; सोपा, सरळ आणि सुटसुटीत उरावा, अशी अपेक्षा आहे. गोस्वामीजींची ‘रामकथा’ मराठीतील सामान्य वाचकालाही कळावी, एवढाच माझा सीमित हेतू.
या ग्रंथाने मराठी वाचकांना तुलसीदासांच्या रामायणाचे छायादर्शन झाल्याचा आनंद मिळाला, तरी पुरे आहे.
– ग. दि. माडगूळकर
पंचवटी । २०.३.७७
Reviews
There are no reviews yet.