Description
निम्म्या मिलियन डॉलर्सच्या बातमीने मला विलक्षण आत्मविश्वास मिळाला.
मी हे कसं साध्य केलं, ते मला व्यवस्थित माहीत होतं आणि मी पुन्हा हे करू शकेन याची मला खात्री होती.
मी एकप्रकारे या कलेत प्रावीण्य मिळवलं होतं, यात शंका नव्हती.
टेलिग्राम संदेशांच्या दुनियेत काम करत असतानाच मी एकप्रकारे सहावं इंद्रिय विकसित केलं होतं.
एखाद्या जाणत्याप्रमाणे मी माझ्या शेअर्सविषयी सर्वकाही अनुभवू शकत असे.
स्टॉक्स कसे चालतील याविषयी मी अचूक सांगू शके. जर आठ अंक पुढे सरकलेला शेअर चार अंकापर्यंत घसरला तरी मी अस्वस्थ होत नसे. माझ्या अपेक्षेप्रमाणे ते ठीकच असे. जर एखादा शेअर मजबूत व्हायला लागला तर त्याची वाढ कोणत्या दिवशी होणार याचा मला पुरेपूर अंदाज येई. हे एक रहस्यमय आणि न उलगडता येणारं सामर्थ्य नि:संशय माझ्यामध्ये होतं. त्यामुळे एका जबरदस्त शक्तीच्या भावनेनं मी भारला गेलो होतो.
– याच पुस्तकातून
प्रस्तुत पुस्तक निकोलस डरवास यांची असफलता, संघर्ष आणि अखेर अभूतपूर्व यश या प्रवासाविषयी सांगते, जिथे त्यांनी केवळ साडेसहा वर्षांच्या काळात दहा कोटींपेक्षा अधिक रुपये कमावले. लक्षात घ्या, ही 1950च्या दशकातली कमाई आहे. स्टॉक मार्केटमधल्या असामान्य यशाची ही अद्वितीय कहाणी गुंतवणूकदारांना आत्मविश्वास देते. सुयोग्यरीत्या गुंतवणूक करून आपली कमाई वाढवण्याचे व्यावहारिक सूत्र सांगते.
Reviews
There are no reviews yet.