Description
” हिंदू धर्माला भारतात पुनर्जीवित करणारे आणि हिंदू धर्माचे थोरपण जगभर समजावून सांगणारे थोर विचारवंत आणि संत म्हणून विवेकानंदांचे कार्य सर्वांना माहीतच आहे. विश्वधर्म समेलनात त्यांनी विश्वबंधुत्वाची भूमिका मांडली.
खरं तर स्वामी विवेकानंद यांना हिंदू धर्माइतकी किंवा त्याहून काकणभर अधिक भारताच्या विकासाची तळमळ होती. त्यांना नवा भारत घडवायचा होता आणि केवळ त्यासाठी त्यांनी भारतभ्रमण केले.
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरताना त्यांनी सामान्य माणसातील स्वाभिमान आणि ‘स्व जागृत करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचे आंदोलन देशभर पेटले; कारण त्यासाठी अनुकूल मनोभमी विवेकानंदांच्या विचारांनी आधीच तयार करून ठेवली होती.
गुरूदेव रवींद्रनाथ टागोर विवेकानंदांचे महत्त्व सांगताना म्हणतात, ‘‘तुम्हाला भारत माहीत करून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा. सर्व विवेकानंद सकारात्मक आहेत, त्यांच्यात नकारात्मक असे काहीही नाही,’’
स्वामीजींना सामान्य माणसांविषयी तळमळ होती. सामान्य माणूस हाच त्यांच्या धर्म आणि विकास या संकल्पनेच्या केंद्रस्थानी होता. स्वामीजींसारखा संत आपल्या विचारांच्या माध्यमातून किती मोठे परिवर्तन घडवू शकतो हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चरित्र वाचायला हवेच.
सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य असलेले प्रेरणादायी चरित्र: ‘स्वामी विवेकानंद’.
————————————————————————————————————————–
जीवनात परिवर्तन हवे असेल, तर आपल्या प्रत्येकामध्ये असणारा ‘कृष्ण’ आपल्याला जागवावा लागेल. धर्माचा, नीतिनियमांचा आणि सामाजिक विचारांचा सूक्ष्मार्थ लावीत कृष्णाने जटिल समस्या सोडविल्या होत्या.
बलाढ्य कौरवांना अद्दल घडवून त्याने एका मोठ्या बदलाचा प्रारंभ केला. सुरुवातीस श्रीकृष्णाकडे ना सैन्य होतं ना कोणती सामग्री; पण तरीही कृष्ण कुठेच थांबला नाही. साहस, प्रचंड श्रम आणि उत्तम नेतृत्वगुणांसह कृष्ण पुढेच जात राहिला.
श्रीकृष्णाचं हे कर्तृत्व व ते मिळविण्याची नीती म्हणजेच कृष्णनीती.
कृष्ण कोण होता? कृष्णाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, कृष्णाचे परिपूर्ण नेतृत्व, राजनीतिज्ञ कृष्ण, तत्त्वज्ञ कृष्ण, प्रेमाचा सिद्धांत, श्रीकृष्णाचे संपत्तीनिर्मितीबद्दलचे धोरण, पृथ्वीचे भविष्य अशा वैशिष्ट्यपूर्ण प्रकरणांद्वारे डॉ. जाखोटिया श्रीकृष्ण जीवनदर्शन घडवितात.
डॉ. गिरीश प. जाखोटिया यांना मराठी भाषेतून ललित लेखन करून राष्ट्रीय चेतना जागविल्याबद्दल पुणे मराठी ग्रंथालयातर्फे ‘कृष्णनीती’ या पुस्तकासाठी चेतना पुरस्कार मिळाला आहे.
या पुस्तकात कृष्णाचे उलगडलेले नेतृत्वगुण, व्यक्तिमत्त्व, त्याचे डावपेच, त्याची रणनीती, त्याचा प्रेमाचा सिद्धांत आपण सर्वांनीच आज आचरणात आणला तर आपली आणि आपल्या या भारत देशाची निश्चितच प्रगती होईल.
अर्थात २१ व्या शतकातही आपला ‘प्रिय कृष्ण’ आचरणीय आहे, गरज आहे ती फक्त त्याच्या नीतीकडे डोळसपणे पाहण्याची!
Reviews
There are no reviews yet.