The Art Of Being Alone | Eat That Frog | Kam Karnyache Niyam | द आर्ट ऑफ लेझिनेस | काम करण्याचे नियम |

₹375

264 Pages
AUTHOR :- Renuka Gavrani
AUTHOR :- Brian Tracy
ISBN :- ‎ 9789349573383

Share On :

Description

स्वतःचे बनायला शिका.
आपण अशा जगामध्ये राहतो, जिथे कोणीही व्यक्ती व कोणतीही गोष्ट आपल्यासोबत कायमची राहू शकत नाही. आपण अतिउत्पादनक्षम वातावरण निर्माण केले आहे, ज्यामध्ये तुमच्या मित्रांना कामाच्या अधिक चांगल्या संधींसाठी दुसऱ्या शहरात जावे लागू शकते किंवा तुम्हाला अभ्यासासाठी तुमच्या कुटुंबापासून दूर जावे लागू शकते. या सतत बदलत असलेल्या चित्रात तुम्ही एक गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे, एकटे असणे म्हणजे एकाकी असणे नव्हे. तुम्ही तुमच्यासोबत आहात एवढाच त्याचा अर्थ आहे !
द आर्ट ऑफ बीइंग अलोन’ या पुस्तकातून तुम्ही तुमच्या एकटेपणाचे रूपांतर ‘एकांतात’ कसे करायचे ते शिकाल. तसेच, एकटे राहण्याच्या कलेत कसे पारंगत व्हायचे ते शिकाल आणि तुमचे ‘सध्याचे आयुष्य’ तुमच्या ‘स्वप्नातील आयुष्यामध्ये’ रूपांतरित कसे करायचे तेही शिकाल.
• तुमचा एकटेपणा एकांतात कसा रूपांतरित करायचा ?
• एकटेपणाचे मूळ कारणच नष्ट करून एकटेपणाचे भय कसे दूर करायचे ? स्वतःच्याच प्रेमात पडण्यासाठी स्वतःला कसे जाणून घ्यायचे व आपल्या अंतरंगात खोलवर दडलेला ‘स्व’ कसा ओळखायचा ?
• एकांताची गोडी कशी लावून घ्यायची व तो प्रगतीचा काळ कसा बनवायचा ?
अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचावे असे पुस्तक – ‘द आर्ट ऑफ बीइंग अलोन.’
रेणुका गवरानी यांना त्यांचे अनुभव व निरीक्षणे यांविषयी लिहायला आवडते. रेणुकांचे पहिले पुस्तक आहे – ‘द वूण्डस् ऑफ माय वर्डस्.’ प्रस्तुत पुस्तकातून जीवन जगण्याविषयीचे धडे मिळतात.

सर्वांत महत्त्वाची कामं करायला शिका – आजच!
आपल्याकडे “”करणे बाकी”” यादीतील सर्व कामं करण्यासाठी कधीच पुरेसा वेळ नसतो आणि भविष्यातदेखील नसेल. यशस्वी व्यक्ती सर्वच काम स्वतः करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. ते सर्वांत महत्त्वाच्या कामांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याचे कसब शिकतात आणि चिकाटीने ती कामे पूर्ण करतात.
एक जुनी म्हण आहे – जर तुम्ही दररोज सकाळी सर्वप्रथम एक जिवंत बेडूक गिळू शकलात, तर तुम्हाला दिवसभर या गोष्टीचे समाधान राहील की, तुमच्यासोबत त्या दिवशी यापेक्षा अजून वाईट काही होऊ शकत नाही. “”बेडूक गिळणे”” याची तुलना दिवसातील सर्वांत आव्हानात्मक कामाशी करा – ज्या कामामध्ये तुमची टाळाटाळ करण्याची शक्यता सर्वांत जास्त असेल; पण कदाचित त्याचाच तुमच्या आयुष्यावर सर्वांत जास्त सकारात्मक प्रभाव पडेल. हे पुस्तक सांगेल की तुमची सर्वांत महत्त्वाची कामे कशी संपवावीत आणि प्रत्येक दिवसाची आखणी कशी करावी. याने तुम्ही फक्त वेगाने कामं करणेच शिकणार नाहीत तर त्याबरोबरच योग्य तीच कामे करायला शिकाल.
बेस्टसेलिंग लेखक ब्रायन ट्रेसी वेळ व्यवस्थापनाचे सर्वांत महत्त्वाचे गुपित सांगतात जे अत्यावश्यक आहे : निर्णयशक्ती, शिस्त आणि संकल्प. या नवीन व सुधारित आवृत्तीमध्ये ते तंत्रज्ञानाविषयी अगदी नवीन माहिती सांगतात की, तुम्ही कशाप्रकारे तंत्रज्ञानाला तुमच्या वेळेवर स्वार होऊ देऊ नये. आजपासूनच टाळाटाळ सोडणे आणि जास्त महत्त्वाची कामे सर्वप्रथम करण्यासाठी ते व्यवहारोपयोगी पायऱ्यांविषयी विस्तृत माहिती देतात.
ब्रायन ट्रेसी हे मानवी क्षमता आणि वैयक्तिक परिणामकारकता विकासाच्या क्षेत्रात अमेरिकेतील अधिकारी व्यक्तींपैकी एक आहेत. ते दरवर्षी अडीच लाखांहून अधिक व्यक्तींना वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासंबंधी मार्गदर्शन करतात. ट्रेसी यांनी अनेक लोकप्रिय पुस्तके लिहिली ज्यामध्ये मॅक्सिमम अचीव्हमेंट, गोल्स आणि द 100 अॅब्सोलूटली अनब्रेकेबल लॉज ऑफ बिजनेस सक्सेस यांचा समावेश होतो. याशिवाय त्यांचे अनेक बेस्टसेलिंग ऑडिओ प्रोग्राम्स आहेत ज्यामध्ये ‘द सायकॉलॉजी ऑफ अॅचीव्हमेंट आणि हाऊ टू स्टार्ट अॅण्ड सक्सीड इन युअर ओन बिजनेस’ हे समाविष्ट आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Art Of Being Alone | Eat That Frog | Kam Karnyache Niyam | द आर्ट ऑफ लेझिनेस | काम करण्याचे नियम |”

Your email address will not be published. Required fields are marked *