Description
तुमचे जीवन ही तुमची सर्वांत मोठी सर्जनशील कामगिरी आहे.’
लहानपणापासून आपल्याला सांगितले गेले आहे की, सर्जनशीलता ही काही ‘निवडक – भाग्यवान प्रतिभावान असाधारण’ अशा लोकांसाठी असते. त्यावर विश्वास ठेवून आपणही मान्य केले की, उरलेले आपण सर्वसामान्य लोक आहोत, ज्यांच्या जीवनात कोणताही भव्य उद्देश नाही.
‘द मॅजिक ऑफ क्रिएटिव्ह लिव्हिंग’च्या माध्यमातून हा गैरसमज आपण
एकत्रितपणे दूर करू.
आपल्या आयुष्याचा खरा उद्देश केवळ आपल्या कामात किंवा नोकरीत नव्हे, तर दैनंदिन जीवनशैलीची निवड करण्यातही सर्जनशील असणे हा आहे.
या पुस्तकात तुम्ही पुढील गोष्टी शिकाल :
* जगाने अद्याप प्रभावित न केलेला तुमच्या आत्म्याचा अस्पर्शित भाग कसा शोधावा ?
* तुमच्या आयुष्याला कलेच्या अद्भुत निर्मितीमध्ये रूपांतरित करण्याचा मार्ग कोणता ? जेणेकरून जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल, तेव्हा तुम्हाला तुमच्या जगण्याचे उबदार वसन अलगद लपेटून घेतल्यासारखे वाटेल ?
* तुमच्या भीतींना स्वीकारण्याची कला कशी आत्मसात करावी ?
* तुम्हाला अधिक सर्जनशील, आनंदी आणि तणावमुक्त करेल असे एक मानसिक आणि भौतिक वातावरण कसे तयार करावे ?
आज तुम्ही ज्या पद्धतीने जगत आहात त्याने तुम्ही समाधानी नसाल आणि तुमचा जीवनाशी संबंध तुटल्यासारखे वाटत असेल तर, ‘द मॅजिक ऑफ क्रिएटिव्ह लिव्हिंग’ तुम्हाला एक समर्थ, सुंदर आणि अंतर्मनाशी समरूपत्व साधणारे जीवन कसे घडवावे याचे मार्गदर्शन करेल.
रेणुका गवरानी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील बेस्टसेलिंग पुस्तकांच्या लेखिका आहेत. प्रामाणिकपणे जगणे आणि दुखावलेल्या हृदयाला स्पर्शणारे व तणावग्रस्त मनांना शांत करणारे लेखन करणे हे त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट आहे.








Reviews
There are no reviews yet.