Description
आदिशंकराचार्यांनी आठव्या शतकात घोषित केल्यानुसार, आपल्या पूर्वजांनी आपल्या भविष्याच्या तयारीसाठी नागा साधू हा योद्ध्यांचा गट निर्माण केला. हा शैव साधूंचा गट नि:स्वार्थी वृत्तीने, अत्यंत खंबीरपणे आणि निडरपणे लढत राहिला आहे. शतकानुशतके, धर्माच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी त्यांनी वीरमरण प्राप्त केलं आहे.
१७५७ साली, नागा साधूंनी आपल्या दैवतांची शस्त्रं उसनी घेतली. आपल्या शंभू महादेवावरच्या असीम श्रद्धेतून त्यांनी गोकुळाच्या रक्षणासाठी अजेय धैर्य गोळा केलं. ४००० सैनिक, २०० अश्व, १०० ऊंट आणि २० तोफा घेऊन गोकुळावर चालून आलेल्या, प्रचंड मोठ्या अफगाण सैन्याविरुद्ध अजाच्या नेतृत्वात त्या नागा साधूंनी आपली अभेद्य भिंत उभारली. भारतामधली अनेक देवळं-मंदिरं उद्ध्वस्त करून प्रचंड नरसंहार करणार्या कुप्रसिद्ध अहमदशाह अब्दालीचा त्या वेळचा सर्वांत क्रूर नेता सरदार खान त्या वेळी अफगाण सैन्याचं नेतृत्व करत होता.
…आणि तो लढा सुरूच आहे. ही नागा योद्ध्यांच्या धैर्याची, शौर्याची आणि निर्धाराची बांधिलकी आहे. मानवी कातडं पांघरलेल्या सैतानी अवलादींशी सुरू असणारा शिवभक्तांचा हा अविरत संघर्ष आहे.
ही गोकुळाची लढाई आहे..
Reviews
There are no reviews yet.