fbpx

The Power Of Now | Practicing The Power

₹399

344 Pages
AUTHOR :- Eckhart Tolle
ISBN :- B08PKYR3NX

Share On :

Description

‘वर्तमानाच्या शक्ती’च्या दिशेने प्रवास करण्यासाठी आपल्याला आपले चिकित्सक मन आणि त्याने निर्मिलेला खोट्या ‘स्व’ला, अहंला मागे सोडून द्यायला हवे. असे असले तरी यद्यपि हा प्रवास आहे मात्र आव्हानात्मक. एखार्ट टॉल यांनी आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी अत्यंत सोपी भाषा आणि प्रश्नोत्तरीचे स्वरूप वापरले आहे. त्यातील खुद्द शब्दच मार्गदर्शक चिन्ह आहेत.
या प्रवासात आपणापैकी बऱ्याच जणांना नवनवीन शोध लागतात – आपण म्हणजे आपले मन नव्हे, आपल्या मानसिक दु:खातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडू शकतो. आताला शरण जाणे हीच अधिकृत मानवी शक्ती आहे. आपल्याला हेपण आढळून येते की, आपल्याभोवती सर्वत्र असलेला अवकाश आणि शांतीप्रमाणेच आपले शरीरही आंतरिक शांतीच्या प्रदेशात प्रवेश करण्याची खरी कळ आहे. खरे तर ही शक्ती सगळीकडे आहे. प्राप्तीच्या या बिंदूतून किंवा प्रवेशद्वारातून आपण वर्तमानात प्रवेश करू शकतो. वर्तमान क्षण, जिथे कोणतीच समस्या अस्तित्वात नसते. इथे आल्यावरच आपल्याला आढळून येते की, आपण आधीपासूनच संपूर्ण आणि परिपूर्ण असतो.
पहिल्यांदा प्रकाशित झाल्यापासून केवळ मौखिक प्रचारातून ‘वर्तमानाची शक्ती’ हे पुस्तक त्या दुर्मीळ पुस्तकांपैकी एक आहे ज्याने वाचकांमध्ये एक अनुभूती निर्मिली आहे – अशी अनुभूती जी त्यांच्या जीवनात उत्तम मूलभूत बदल घडवू शकते.

————————————————————————————————————————–
वर्तमान क्षणाचा स्वीकार करणे सर्वांसाठीच अत्यावश्यक आहे. वर्तमान क्षण वगळता तुम्हे स्वतःचे असे भूत, भविष्य दुसरे काहीच नसते. हे पुस्तक अतिशय शांत चित्ताने वाचा किंवा एकदम कोणते तरी एखादे पान उघडा आणि त्यातील शब्दांकडे किंवा शब्दांतील मोकळ्या जागेकडे बघा; कदाचित लगेच किंवा काही वेळानंतर तुम्हाला तुम्हे जीवन बदलून टाकणारे काही तत्त्व आढळून येतील. त्यामुळे तुम्हाला फक्त तुम्हे जगणेच नाही तर तुम्हे विश्व बदलून टाकणारी शक्ती आणि सामर्थ्य तुम्हाला सापडेल. ती शक्ती आणि सामर्थ्य. आता इथे आहे, या क्षणात आहे. या क्षणाचा तुम्ही उपभोग घेण्यात आहे. जे काही आहे ते आता, इथे या क्षणात आहे, नंतर काहीच नाही. हे सर्व फक्त तुमच्या हातात आहे. या क्षणाचे सामर्थ्य जाणून घ्या. सुखी, समाधानी आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी वर्तमान क्षणाचा योग्य प्रकारे वापर करायला शिकविण्याच्या सोप्या पद्धती समजावून सांगणारे जगातील सर्वाधिक खपाचे पुस्तक. “आपल्या जीवनातील वर्तमान क्षणाचा परिपूर्ण वापर करण्यासाठी आणि भूतकाळ तसेच भविष्यकाळापासून मुक्तता मिळविण्यासाठी हे पुस्तक म्हणजे योग्य दस्तावेज आहे. तुम्हे विचार परिवर्तीत करण्याचे यात सामर्थ्य आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे या वर्तमानक्षणी जास्त उत्साह आणि परमोच्च आनंद मिळणे.” – ओपरा विनफ्रे इन ओ, दि ओपरा मॅगझिन लेखकाबद्दल: ‘द पॉवर ऑफ नाऊ’ या सर्वाधिक खपाच्या पुस्तकामुळे जागतिक दर्जाचे अध्यात्म शिक्षक म्हणून एखार्ट टॉल् यांना मान्यता मी. ते सतत प्रवास करीत असतात आणि व्याख्याने देतात. त्यांच्या व्याख्यांनाना खूप मोठी गर्दी होते. जेव्हा ते प्रवास करीत नसतात तेव्हा कॅनडामधील ब्रिटिश कोलंबियातील व्हॅनाकोव्हर येथे शांतपणे राहतात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Power Of Now | Practicing The Power”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat