fbpx

The Power of Your Subconscious Mind | Paishanche Vyavasthapan

₹550

512 Pages
AUTHOR :- Dr. Jyoti Dharmadhikari
ISBN :- 978-9352204601

Share On :

Description

तुमच्या आत दडलेली अभूतपूर्व शक्ती मिळवण्याचा मार्ग दाखविणारे सर्वोत्तम खपाचे पुस्तक तुमच्या अचेतन मनाकडे असलेल्या अविश्वसनीय शक्तीचा वापर कसा केला जाऊ शकतो, हे या पुस्तकाने जगभरातील लाखो वाचकांना शिकविले आहे. तुम्ही करीत असलेल्या प्रत्येक कामावर अचेतन मनाचा प्रभाव पडत असतो, हे डॉ. मर्फी यांनी आध्यात्मिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे दाखवून दिले आहे. जीवनातील यशाच्या सत्य कथांनी भरलेले हे पुस्तक तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात यश मिळविण्याचे रहस्य सांगणारे आहे. अचेतन मनाच्या शक्तीचा उपयोग करून तुम्ही काय काय करू शकता, हे या पुस्तकात सांगितले आहे.
• आरोग्य सुधारू शकता आणि आजार बरे करू शकता.
• प्रमोशन मिळवू शकता, पगारवाढ मिळवू शकता आणि लोकप्रियही होऊ शकता.
• हवी असलेली संपत्ती मिळवू शकता.
• आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारू शकता तसेच कुटुंब, सहकारी आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करू शकता.
• तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेमसंबंध अधिक दृढ करू शकता.
• भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता.
• ‘चिरतरुण’ राहण्याचे रहस्य जाणून घेऊ शकता. या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, आनंद आणि मानसिक शांती मिळवू शकता.

————————————————————————————————————————–

कोणताही छोटा-मोठा उद्योग हा ’वित्तीय नियोजन, नियंत्रण व मोजमापा’शिवाय करताच येत नाही. यासाठी ’वित्त व्यवस्थापन’ नीटपणे माहीत असायला हवे.
वित्त व्यवस्थापन करण्यासाठी तुमच्याकडे वित्तीय व्यवस्थापक किंवा सल्लागार असतो; परंतु उद्योगाचे ’मालक’ म्हणून त्याचे नफा – तोटा पत्रक (Profit & Loss Account) आणि ताळेबंद पत्रक (Balance Sheet) तुम्हाला ढोबळमानाने बनवता, वाचता आले पाहिजे.
तुमच्या उद्योगाची ’वित्तीय स्थिती’ तुम्हाला वेळोवेळी तपासता आली पाहिजे. महत्त्वाच्या उद्योजकीय निर्णयांचा वित्तीय परिणाम काय होईल हेसुद्धा तुम्हाला मोजता यायला हवे.
तुम्ही जे उत्पादन/वस्तू किंवा जी सेवा ठााहकाला देऊ इच्छिता त्यासाठीचा खर्च नीटपणे मोजता आला तरच तुम्ही त्या उत्पादनाच्या विक्रीची योग्य अशी किंमत ठरवू शकाल. या विक्रीच्या किमतीने तुम्हाला अपेक्षित असा ‘ROI’ सुद्धा मिळावयास हवा. तुम्ही जेव्हा नव्या उद्योगात किंवा प्रकल्पात गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला अशा गुंतवणुकीचे शास्त्रोक्त पद्धतीने मूल्यमापन करता आले पाहिजे.
वरील सर्व उद्देश लक्षात घेऊन मी या पुस्तकाचे अत्यंत सोप्या भाषेत लेखन केले आहे. तुम्हाला हे पुस्तक नक्की आवडेल व उपयोगी पडेल याची मला खात्री आहे.
– डॉ. गिरीश जाखोटिया
डॉ. गिरीश जाखोटिया हे मराठीतील नामांकित लेखक आहेत. डॉ. जाखोटिया हे आंतरराठ्रीय व्यवस्थापकीय, उद्योजकीय व वित्तीय सल्लागार आहेत. टाटा समूह, महिंद्रा समूह, गोदरेज, सिमेंस, एल अॅण्ड टी, ब्रिटिश पेट्रोलियम, ओमानची सेंट्रल बँक, बजाज ऑटो इ. साठहून अधिक नामांकित कंपन्यांसाठी त्यांनी सल्लागार म्हणून काम केले आहे. वित्त व व्यूहात्मक व्यवस्थापनावरील त्यांचे इंठाजीतील ठांथ उद्योजकीय क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नावावर काही महत्त्वाचे कॉपीराइट्स आहेत. असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स, दिल्लीतर्फे त्यांना अखिल भारतीय सर्वोत्तम प्राध्यापक पुरस्कार व बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे त्यांना उद्योजकीय विषयातील सर्वोत्तम प्राध्यापक पुरस्कार मिळालेला आहे. सध्या ते आणि त्यांची पत्नी मंजिरी जाखोटिया अॅण्ड असोसिएट्स ही सल्लागार फर्म विलेपार्ले, मुंबई येथून चालवितात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Power of Your Subconscious Mind | Paishanche Vyavasthapan”

Your email address will not be published. Required fields are marked *

Click To Chat